Smoothening VS Keratin: केस खूप ड्राय आणि फ्रिझी झालेत? केसांसाठी कोणता ट्रीटमेंट फायदेशीर? जाणून घ्या

Shruti Vilas Kadam

स्मूदनिंग आणि केराटिन म्हणजे काय?

स्मूदनिंग ही केस सरळ आणि फ्रिझ-फ्री करण्याची प्रक्रिया आहे, तर केराटिन ट्रीटमेंटमध्ये केसांना प्रोटीनचा पुरवठा करून त्यांना निरोगी, मऊ आणि चमकदार बनवले जाते.

Smoothening VS Keratin

केसांच्या टेक्स्चरवर परिणाम

स्मूदनिंगमुळे केस अधिक सरळ दिसतात. केराटिन ट्रीटमेंट केसांचे नैसर्गिक टेक्स्चर टिकवून ठेवते आणि फक्त फ्रिझ कमी करते.

Smoothening VS Keratin

केसांच्या आरोग्यासाठी काय चांगले?

केराटिन ट्रीटमेंटमध्ये केसांना आवश्यक प्रोटीन मिळत असल्याने ते तुलनेने अधिक पोषणदायी मानले जाते. स्मूदनिंगचा मुख्य भर केस सरळ करण्यावर असतो.

Smoothening VS Keratin | Saam Tv

किती काळ टिकतो

स्मूदनिंगचा प्रभाव साधारण 6 ते 12 महिने टिकू शकतो. केराटिन ट्रीटमेंटचा परिणाम सामान्यतः 3 ते 6 महिने टिकतो.

Smoothening VS Keratin

कोणत्या केसांसाठी योग्य?

खूप कुरळे किंवा वेव्ही केस असतील तर स्मूदनिंग अधिक प्रभावी ठरू शकते. फ्रिझी, कोरडे आणि नुकसान झालेल्या केसांसाठी केराटिन ट्रीटमेंट फायदेशीर असते.

Smoothening VS Keratin | Saam Tv

देखभाल आणि काळजी

दोन्ही ट्रीटमेंटनंतर सल्फेट-फ्री शॅम्पू वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र केराटिन ट्रीटमेंटनंतर योग्य देखभाल केल्यास केस अधिक काळ चमकदार राहतात.

Smoothening VS Keratin | Saam tv

खर्च आणि परिणाम

स्मूदनिंगचा खर्च सलून आणि केसांच्या लांबीनुसार जास्त असू शकतो. केराटिन ट्रीटमेंटही महाग असली तरी केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी अनेकजण तिला प्राधान्य देतात.

Smoothening VS Keratin

Skin Care: पार्लरमध्ये पैसे खर्च नकरता चेहरा दिसेल नॅचरल ग्लो, १ महिना प्या 'हा' स्पेशल चाहा

Face care | Saam TV
येथे क्लिक करा