Rohit Pawar on Ajit Pawar VIDEO: सरकार घाबरलं? रोहित पवारांची अजित पवारांवर टीका Saam TV
Video

Rohit Pawar on Ajit Pawar VIDEO: सरकार घाबरलं? रोहित पवारांची अजित पवारांवर टीका

Rohit Pawar on Ajit Pawar News: रोहित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांवर निशाणा साधला आहे. परळी खून प्रकरणी देखील त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Mayur Sawant

रोहित पवार यांची पत्रकार परिषद झाली यादरम्यान त्यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. अजित पवार यांचं भाषणं ऐकलं तर कुठे तरी सरकार घाबरलं आहे असं लक्षात येत आहे. असं रोहित पवार म्हणाले. अजित पवार यांनी आपल्या मतदार संघाचा उल्लेख केला. जानाई, शिरसाई आणि पुरंदर उपसा प्रकल्पाचा त्यांनी उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं. काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी यामधे लक्ष घातलं होतं. दादा घाबरले आहेत असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

यादरम्यान रोहित पवार यांनी बजेट बद्दल वक्तव्य केलं आहे. हे बजेट आहे ते लोकशाहीचं प्रतीक आहे. या सरकारला अहंकार आला होता लोकांनी त्यांना लोकसभेत त्यांची जागा दाखवली. लोकांना सरकार घाबरलं आहे. लोकांना आपलसं करण्यासाठी सरकारने हे बजेट काढल्याचं रोहित पवार म्हणाले.

परळी खून बबन गीते अटक

परळीत धनंजय मुंडे यांचे खुप काही चालतं असं नाही, कारण त्यांचा राईट आणि लेफ्ट hand परळी चालवतात. त्यांच्या वतीने काही करण्यात आलं आहे का? हे पाहिलं पाहिजे, कारण आमच्या बबन गित्ते यांनी परळीत बोगस मतदान झालं हे समोर आणल होतं. त्याचा हा राग असावा. धनंजय मुंडे यांच्यावर आरोप होतोय की त्यांचा राईट अँड लेफ्ट hand हे काल दिवसभर आंदोलनात देखील पाहायला मिळाले. त्यांची देखील चौकशी व्हायला हवी अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

ऑन दादाजी भुसे पीक विमा

पीक विमा योजनेचं आम्ही स्वागत केलं होतं, पण हे पैसे शेतकऱ्यांना मिळणार आहेत का? या योजनेचा फायदा कोणाला झाला? पीक विमा कंपन्यांना याचा फायदा झाल्याचं रोहित पवार म्हणाले. माजी कृषी मंत्री म्हणून दादाजी भुसे यांना काही वाटा मिळाला का? असं म्हणत रोहित पवार यांनी खोचक टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Dark elbows causes: कोपर काळं पडतंय? धूळ-मळ समजून दुर्लक्ष करू नका, शरीरातील ‘या’ गंभीर समस्येचा असू शकतो संकेत

Maharashtra News Live Update: सानपाडा येथे हॅाटेलमध्ये सिलेंडर स्फोट, २ कामगार जखमी

Weakness after fever: तापामुळे अशक्तपणा आलाय? दूर करण्यासाठी 'हे' 4 पदार्थ करतील मदत

Instant Modak Recipe : वेळ कमी आहे? गॅसची गरजही नाही, फक्त ५ पदार्थांनी बनवा झटपट कळीदार मोदक

SCROLL FOR NEXT