Weakness after fever: तापामुळे अशक्तपणा आलाय? दूर करण्यासाठी 'हे' 4 पदार्थ करतील मदत

Surabhi Jayashree Jagdish

अशक्तपणा

ताप किंवा आजारातून बरे झाल्यानंतर काही दिवस शरीरात अशक्तपणा जाणवू शकतो. अशावेळी शरीराला पुरेशी ऊर्जा आणि आवश्यक पोषकतत्त्वं मिळणं महत्त्वाचं असते. त्यामुळे नाश्त्यासह दिवसभराच्या आहारात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले पदार्थ ठेवणे फायदेशीर ठरते.

foods for weakness | saam tv

अंडी

बनवायला सोपे आणि प्रोटीनचा चांगला स्रोत असलेले अंडे नाश्त्यासाठी उपयोगी पर्याय आहे. अंड्यामध्ये शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन तसंच विविध जीवनसत्त्वं आणि खनिजं मिळतात. तापानंतर भूक कमी असेल तर उकडलेलं अंडं किंवा कमी तेलात बनवलेलं अंडं तुम्ही खाऊ शकता.

post fever recovery foods | saam tv

उपमा

सकाळच्या नाश्त्यासाठी उपमा हा हलका आणि पोटभरीचा पर्याय ठरू शकतो. रवा, भाज्या आणि शेंगदाणे यांचा वापर केल्यास उपम्यातून कार्बोहायड्रेट, फायबर आणि काही प्रमाणात प्रोटीन मिळतं. त्यात आलं, जिरं आणि कढीपत्ता यांसारखे पदार्थ घातल्याने चव वाढते.

healthy breakfast for weakness | saam tv

पोहे

पोहे हा रोजच्या नाश्त्यात सहज समाविष्ट करता येणारा पदार्थ आहे. त्यामध्ये कार्बोहायड्रेट मिळत असल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होते, तर भाज्या आणि शेंगदाणे घातल्यास त्यातील पोषक घटक वाढतात.

energy boosting foods | saam tv

पालकाची इडली

नेहमीच्या इडलीच्या पिठात पालक मिसळून पौष्टिक आणि चवदार पालकाची इडली तयार करता येते. पालकामधून फोलेट, व्हिटॅमिन K, व्हिटॅमिन A आणि इतर पोषक घटक मिळतात. ही इडली सांबारासोबत खाल्ल्यास प्रोटीन आणि इतर पोषक घटकांचा समावेश आहारात करता येतो.

foods for post illness recovery | saam tv

नाश्त्यात प्रोटीन

तापानंतर शरीराची ताकद परत मिळवताना आहारात पुरेसे प्रोटीन असणं महत्त्वाचं आहे. अंडी, दूध, दही, डाळी, कडधान्यं आणि शेंगदाणे हे प्रोटीनचे सहज उपलब्ध स्रोत आहेत.

recovery diet after fever | saam tv

कार्बोहायड्रेट आणि ऊर्जा

शरीराला दैनंदिन कामांसाठी ऊर्जेची गरज असते आणि कार्बोहायड्रेट हा ऊर्जेचा प्रमुख स्रोत आहे. पोहे, उपमा, इडली, भात, पोळी आणि ओट्स यांसारख्या पदार्थांमधून कार्बोहायड्रेट मिळते. त्यामुळे अशक्तपणा जाणवत असताना कार्बोहायड्रेट पूर्णपणे टाळण्याऐवजी योग्य प्रमाणात संतुलित आहाराचा भाग म्हणून खाणं फायद्याचं ठरेल.

protein after illness | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

foods to regain strength | saam tv

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

येथे क्लिक करा