LDL cholesterol: निरोगी व्यक्तीची कोलेस्ट्रॉल लेव्हल किती? ही रेंज माहित आहे का?

Surabhi Jayashree Jagdish

सायलेंट किलर

कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतानाही अनेकदा कोणतीही ठळक लक्षणं दिसत नाहीत, त्यामुळे ते तपासणीशिवाय लक्षात येऊ शकत नाही. विशेषतः LDL म्हणजेच वाईट कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा होण्याची शक्यता वाढते.

normal LDL cholesterol | saam tv

कोलेस्ट्रॉलची पातळी कशी तपासली जाते?

शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी जाणून घेण्यासाठी लिपिड प्रोफाइल टेस्ट केली जाते. या तपासणीत एकूण कोलेस्ट्रॉलसोबत LDL, HDL आणि ट्रायग्लिसराइड्स यांचीही माहिती मिळते. प्रौढ व्यक्तींमध्ये साधारणपणे एकूण कोलेस्ट्रॉल 200 mg/dL पेक्षा कमी असणं योग्य मानलं जातं, तर LDL 100 mg/dL पेक्षा कमी असणं चांगलं मानलं जातं.

high LDL cholesterol | saam tv

LDL चं प्रमाण

LDL कोलेस्ट्रॉल 100 mg/dL पेक्षा कमी असेल तर ते सामान्यतः ‘ऑप्टिमल’ म्हणजेच योग्य पातळी मानली जाते. मात्र हृदयरोग असलेल्या किंवा हार्ट अटॅकचा धोका जास्त असलेल्या व्यक्तींसाठी LDL चे लक्ष्य यापेक्षाही कमी असू शकते.

very high LDL cholesterol | saam tv

निरोगी व्यक्तीमध्ये LDL 100 ते 129 mg/dL असल्यास?

ज्या व्यक्तीला हार्ट अटॅकचा धोका आहे किंवा इतर मोठे जोखमीचे घटक नाहीत, तिच्यामध्ये LDL 100 ते 129 mg/dL ही पातळी near optimal किंवा above optimal मानली जाते. या पातळीला थेट ‘हाय कोलेस्ट्रॉल’ मानलं जात नाही.

LDL cholesterol 100 | saam tv

LDL 130 ते 159 mg/dL असल्यास काय?

लिपिड प्रोफाइलमध्ये LDL 130 ते 159 mg/dL आल्यास त्याला ‘borderline high’ म्हणजेच सीमारेषेवरील वाढलेलं LDL मानलं जातं. या पातळीवर LDL हे इष्ट पातळीपेक्षा जास्त असतं आणि हार्ट अटॅकच्या एकूण जोखमीचं मूल्यांकन करणं महत्त्वाचं ठरतं.

LDL cholesterol 160 | saam tv

LDL 160 ते 189 mg/dL असल्यास?

LDL कोलेस्ट्रॉल 160 ते 189 mg/dL दरम्यान असल्यास ते ‘high’ म्हणजेच जास्त या श्रेणीत येतं.

या पातळीवर वाढलेलं LDL हार्ट अटॅक आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा धोका वाढवणाऱ्या घटकांपैकी एक आहे. अशा वेळी व्यक्तीचं वय, रक्तदाब, मधुमेह, कौटुंबिक इतिहास लक्षात घेऊन डॉक्टर पुढील उपचार ठरवू शकतात.

cholesterol and heart disease | saam tv

LDL 190 mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास?

LDL कोलेस्ट्रॉल 190 mg/dL किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास ते ‘very high’ या श्रेणीत येतं.

अशा परिस्थितीत वैद्यकीय तपासणी करून कारण शोधणं आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य उपचार घेणं आवश्यक ठरतं.

borderline high LDL | saam tv

टीप

ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Cinnamon water: सकाळी सकाळी एक ग्लास प्या दालचिनीचं पाणी, मिळतील जबरदस्त फायदे

Weight loss | saam tv
येथे क्लिक करा