Police and bomb squad conducting search operation at Girgaon ISKCON temple after threat mail. Saam Tv
Video

ISKCON Temple Bomb Threat: गिरगावमधील ISKCON मंदिराला पुन्हा धमकीचा मेल; बॉम्ब स्क्वॉडची तपासणी|VIDEO

Mumbai ISKCON Temple Bomb Squad: गिरगाव येथील ISKCON मंदिराला पुन्हा धमकीचा मेल आला असून ही तिसऱ्यांदा अशी घटना घडली आहे. बॉम्ब स्क्वॉडने मंदिर परिसराची तपासणी केली पण संशयास्पद काहीही आढळले नाही

Omkar Sonawane

गिरगाव ISKCON मंदिराला तिसऱ्यांदा धमकीचा मेल आला

मेल ‘इमानुएल सेक्रन’ या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला

बॉम्ब स्क्वॉडने तपासणी केली पण संशयास्पद काहीही आढळले नाही

वारंवारच्या धमक्यांमुळे भाविकांमध्ये भीती आणि चिंता निर्माण

गिरगाव येथील ISKCON मंदिराला पुन्हा एकदा धमकीचा मेल आला असून ही तिसऱ्यांदा अशी धमकी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. मंदिराच्या कार्यकारी यंत्रणेच्या अधिकृत ईमेलवरून हा मेल आला असून, तो ‘इमानुएल सेक्रन’ या ईमेल आयडीवरून पाठवण्यात आला होता. धमकीचा मेल मिळताच बॉम्ब स्क्वॉड आणि पोलिसांनी मंदिर परिसराची कसून तपासणी केली, मात्र तपासणीत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. सध्या गावदेवी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

यापूर्वीही मंदिराला अशाच प्रकारचे धमकीचे मेल आले होते. प्रत्येक वेळी तपासणीनंतर कोणतीही धोकादायक वस्तू आढळली नसली तरी, या वारंवार होणाऱ्या घटनांमुळे भाविकांमध्ये भीती आणि चिंता निर्माण झाली होती. पोलिसांकडून ईमेलच्या स्त्रोताचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diabetes First Symptom: डायबेटिसचं पहिलं लक्षण दिसतं आपल्या डोळ्यात, नेमके काय बदल होतात? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update: अजितदादा राज्याचे लवकरच मुख्यमंत्री होतील- आमदार अमोल मिटकरी

Health Tips : सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी या ५ गोष्टी कराच, आरोग्य राहिल उत्तम

Manikrao Kokate: निवडणुकीच्या तोंडावर अजितदादांना धक्का; माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द?

Bigg Boss Marathi Fame Actor : गुलीगत सूरज चव्हाणनंतर बिग बॉस मराठीचा 'हा' अभिनेता चढणार बोहल्यावर; थाटात पार पडलं केळवण, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT