Fugitive Ghotya Gite seen on railway tracks issuing a suicide threat in a viral video, accusing Jitendra Awhad. Saam Tv
Video

Beed Crime: रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा; वाल्मीक कराडच्या समर्थकाचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल|VIDEO

Ghotya Gite Viral Video: महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार आरोपी गोट्या गीतेचा रेल्वे रुळावर बसलेला धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Omkar Sonawane

बीड: महादेव मुंडे हत्या प्रकरणातील फरार असलेला संशयित आरोपी गोट्या गीतेचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गोट्या गीतेने थेट रेल्वे रुळावर बसून आत्महत्येचा इशारा दिला आहे.

या व्हिडिओमध्ये गोट्या गीते म्हणतो की, वाल्मीक कराड म्हणजे साक्षात विठ्ठलाचा अवतार आहे, तर बापू आंधळे खून प्रकरणातील आरोपी बबन गीतेला पोलिसांनी सिलेंडर करावं. शिवाय, माझ्यावर आरोप करणाऱ्या जितेंद्र आव्हाडांनी हे आरोप थांबवावे. अन्यथा मी आत्महत्या करेल आणि त्याला जबाबदार फक्त जितेंद्र आव्हाड असतील, असा इशारा या व्हिडिओमधून गोट्याने दिला आहे. हा संपूर्ण प्रकार रेल्वे रुळांवर बसून चित्रीत करण्यात आला असून, व्हिडिओच्या माध्यमातून त्याने मोठा भावनिक स्फोट केलाय.

महादेव मुंडे खून प्रकरणातील मुख्य संशयितांपैकी एक असलेला गोट्या गीते अजूनही फरार आहे. मात्र, आता तो स्वतःच असा इशारा देतोय, त्यामुळे त्याला लवकर अटक होते का, याकडेही सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात काँग्रेस पक्ष करणार मंथन

Mantralaya Ceiling Collapsed: मंत्री कॅबिनेट बैठकीत बिझी असतानाच मंत्रालयात छत कोसळलं, नेमकं काय घडलं, पाहा | VIDEO

Sevai Pulao Recipe : रोजचा डाळ-भात खाऊन कंटाळलात? जेवणाला खास बनवा चमचमीत शेवयाचा पुलाव

Raksha Bandhan Saree Gift: राखीपौर्णिमेच्या निमित्ताने तुमच्या बहिणीला भेट द्या ही सुंदर साडी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणीने गोर-गरिबांचा 'आनंद' हिरावला; गणेशोत्सवात नाही मिळणार 'आनंदाचा शिधा'

SCROLL FOR NEXT