A youth clinging to a cement pillar in Ramkund during sudden water surge, later rescued by authorities – Nashik, July 2025 Saam Tv
Video

Nashik Rain: नाशिकच्या गंगापुर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, अन् एक तरुण रामकुंडात अडकला, पाहा थरारक प्रसंग|VIDEO

Terrifying Rescue: नाशिकच्या गंगापूर धरणातून अचानक वाढलेल्या विसर्गामुळे रामकुंडात एक तरुण अडकला. अर्धा तास सिमेंट खांबाचा आधार घेतल्यानंतर स्थानिकांच्या मदतीने त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

Omkar Sonawane

नाशिकमध्ये पावसाचा जोर कायम असून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 4 हजार 656 इतका पाण्याचा विसर्ग गोदापात्रामध्ये सुरू आहे. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पुर परिस्थिती ओढवली असून आजूबाजूच्या परिसरात पुन्हा पाणी शिरले आहे.

याच दरम्यान रामकुंडात रात्रीच्या सुमारास एक तरुण पाण्याच्या प्रवाहात अडकल्याची घटना घडली. पाण्याचा विसर्ग वाढवल्याने हा तरुण अडकून पडला होता. परिणामी पाण्यात अडकलेल्या तरुणाने तब्बल अर्धा तास सिमेंट खांबाचा आधार घेतला. हा थरारक प्रसंग स्थानिकांच्या लक्षात आला आणि तरूणांनी रेस्क्यू टीमला ही माहिती दिली आणि काही वेळातच मोठ्या कसरतीनंतर या तरुणाला बाहेर काढण्यात यश आले आहे. अचानक गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्याने तरुणाची मोठी फजिती झाली होती. मात्र तरुणाला सुखरूप पुराच्या पाण्यामधून बाहेर काढल्याने मोठी दुर्दैवी घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna News: मोठी बातमी! महानगरपालिकेच्या आयुक्तांना १० लाखांची लाच घेताना अटक

Bjp vs Shivsena: दिवाळीआधीच महायुतीत वादाचे फटाके, 'ठाण्यात भाजपचा महापौर होणार' भाजपचा स्वबळाचा नारा

Nashik Politics: नाशिकमध्ये भाजपची जबरदस्त खेळी; कोकाटेंचा भाजपमध्ये प्रवेश

Kalyan News : कल्याण डोंबिवली शहर रात्री प्रकाशमय होणार; महापालिकेने घेतला मोठा निर्णय

KOLHAPUR GOKUL MORCHA: दूध उत्पादकांचा डिबेंचरसाठी गोकूळ दुध संघाविरोधात मोर्चा; पण डिबेंचर म्हणजे नेमकं काय?

SCROLL FOR NEXT