Uddhav Thackeray during the protest at Mumbai Marathi Patrakar Sangh where demonstrators burnt the GR against Hindi imposition. saam tv
Video

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Uddhav Thackeray Protests: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी मुंबईत २५० ते ३०० आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. उद्धव ठाकरे यांची आंदोलनात उपस्थिती होती. राज्य सरकारच्या निर्णयाचा तीव्र निषेध करण्यात आला.

Omkar Sonawane

हिंदी सक्तीच्या विरोधात रविवारी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या परिसरात करण्यात आलेल्या आंदोलनात जीआरची होळी केल्याप्रकरणी तब्बल २५० ते ३०० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समितीचे डॉ. दीपक पवार यांच्यासह अनेक आंदोलकांवर मुंबई पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.

हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात आंदोलनात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही विशेष उपस्थिती होती. त्यांनी यावेळी हिंदी सक्तीविरोधात सरकारवर जोरदार टीका केली होती आणि राज्य सरकारच्या भूमिकेचा तीव्र निषेध नोंदवला होता.

जीआरची होळी करत राज्य सरकारच्या निर्णयाचा प्रतिकात्मक निषेध करण्यात आला. मात्र यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे कारण देत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या आंदोलनामुळे राज्यात पुन्हा एकदा मराठी विरुद्ध हिंदी या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

India vs Pakistan Final: आशिया कप फायनलमध्ये भारत- पाकिस्तान पुन्हा आमने सामने

SCROLL FOR NEXT