Causes Of Pimples: चेहऱ्यावर सतत पिंपल्स का येतात? कसे कमी होतील नको असलेले पिंपल्स

Shruti Vilas Kadam

हार्मोनल बदल

का येतात? किशोरवय, मासिक पाळी, गर्भधारणा किंवा ताणतणावामुळे हार्मोन्स बदलतात आणि तेलनिर्मिती वाढते.
कसे कमी कराल? नियमित झोप, ताण कमी ठेवणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य उपचार घ्या.

Face care | Saam Tv

त्वचेतील अतिरिक्त तेल (ऑइली स्किन)

का येतात? जास्त तेलामुळे छिद्रे बंद होतात.
कसे कमी कराल? ऑइल-फ्री फेसवॉश वापरा, दिवसातून २ वेळा चेहरा स्वच्छ ठेवा.

Face Care

चुकीचा आहार

का येतात? जंक फूड, जास्त साखर, तेलकट पदार्थ पिंपल्स वाढवतात.
कसे कमी कराल? फळे, भाज्या, पाणी, फायबरयुक्त आणि संतुलित आहार घ्या.

Face Care

अपुरी स्किनकेअर व स्वच्छता

का येतात? धूळ, घाण आणि बॅक्टेरिया साचल्याने संसर्ग होतो.
कसे कमी कराल? मेकअप काढून झोपा, चेहरा नियमित स्वच्छ ठेवा.

Face Care | Saam tv

चुकीची स्किनकेअर उत्पादने

का येतात? जड क्रीम, चुकीचा मेकअप रोमछिद्रे बंद करतो.
कसे कमी कराल? तुमच्या त्वचेप्रकारानुसार (oil-free, non-comedogenic) उत्पादने वापरा.

Face Care

ताणतणाव आणि अपुरी झोप

का येतात? स्ट्रेसमुळे हार्मोनल असंतुलन होते.
कसे कमी कराल? ७–८ तास झोप, योग-प्राणायाम, मेडिटेशन करा.

Face Care

पिंपल्स दाबण्याची सवय

का येतात? दाबल्याने इन्फेक्शन पसरते आणि डाग पडतात.
कसे कमी कराल? पिंपल्सला हात लावू नका; गरज असल्यास त्वचारोगतज्ज्ञांचा सल्ला घ्या.

Face Care

Shahi Tukra Recipe: सणासुदीला किंवा खास दिवशी करा टेस्टी शाही तुकडा, वाचा सोपी रेसिपी

Shahi Tukra Recipe | Saam Tv
येथे क्लिक करा