Shruti Vilas Kadam
पांढऱ्या ब्रेडच्या चकत्या, दूध, साखर, साजूक तूप/तेल, वेलची पूड, केशर, काजू, बदाम, पिस्ते.
ब्रेडच्या कडा कापून घ्या आणि ब्रेड त्रिकोणी किंवा चौकोनी आकारात कापा. कढईत तूप किंवा तेल गरम करून ब्रेडचे तुकडे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.
एका भांड्यात साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक तयार करा. पाकात वेलची पूड आणि थोडे केशर घाला.
तळलेले ब्रेडचे तुकडे गरम साखरेच्या पाकात हलकेच बुडवून बाजूला ठेवा.
दूध उकळून घट्ट होईपर्यंत आटवा. त्यात साखर, केशर आणि थोडी वेलची पूड घालून छान रबडी तयार करा.
सर्व्हिंग प्लेटमध्ये पाकात भिजवलेले ब्रेड ठेवा. त्यावर गरम रबडी ओता आणि काजू, बदाम, पिस्त्यांची सजावट करा.
शाही तुकडा गरम किंवा थंड दोन्ही प्रकारे सर्व्ह करता येतो. हा पदार्थ खास प्रसंगी मिठाई म्हणून उत्तम लागतो.