Farmers in Yavatmal wave black flags at Deputy CM Ajit Pawar during his visit; police intervene with lathi charge. Saam Tv
Video

शेतकऱ्यांचा रोष उफाळला! कर्जमाफीच्या मागणीवरून अजित पवारांना काळे झेंडे, पोलिसांचा लाठीचार्ज|VIDEO

Tension in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान बाभुळगावमध्ये शेतकऱ्यांनी काळे झेंडे दाखवत सरकारविरोधात घोषणाबाजी केली.

Omkar Sonawane

यवतमाळ: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या यवतमाळ जिल्हा दौऱ्यादरम्यान बाभुळगावमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी आंदोलक भूमिक घेतली. बाभुळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने नगरसेवक अक्षय राऊत आणि सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नांदुरकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून सरकारचा निषेध नोंदवला.एकीकडे नागपूरमध्ये बच्चू कडू यांनी मोठे कर्जमाफी मिळावी म्हणून आंदोलन पुकारले आहे. तर आज अजित पवार हे यवतमाळमध्ये येत असताना स्थानिक नगरसेवकांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केल्याचे पाहायला मिळाले.

बाभुळगाव बसस्थानकाजवळ झालेल्या या आंदोलनात शेतकऱ्यांना कर्जमाफी न देणाऱ्या सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. “शेतकऱ्यांना न्याय द्या!”, “कर्जमाफी लागू करा!”, “कर्जमाफी न देणाऱ्या सरकारचा निषेध असो!” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.काहीवेळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Margashirsha Vrat: मार्गशीर्ष महिन्यात नॉन व्हेज का खात नाहीत? धार्मिक आणि शास्त्रीय कारण माहितीये का?

Hot Shower Winter: हिवाळ्यात गरम पाण्याने अंघोळ करूनही थंडी का वाजते? तज्ज्ञांनी सांगितलं खरं कारण

निवडणुकांच्या आधी मुंबईत धक्कादायक प्रकार; टॉयलेटच्या फ्लशमध्ये आढळली कोरी मतदार ओळखपत्रे|VIDEO

Maharashtra Government: कर्मचाऱ्यांनो, आमदार-खासदारांशी कसं वागणार? शासनानं काढलं परिपत्रक

Chanakya Niti: लोकं तुमचा आदर केव्हा करतील? चाणक्यांनी सांगितल्या महत्त्वाच्या टीप्स

SCROLL FOR NEXT