Nashik VIDEO: कांदा महाबॅंकवर शेतकरी नाराज, कांद्याला योग्य तो भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी Saam TV
Video

Nashik VIDEO: कांदा महाबॅंकवर शेतकरी नाराज, शेतकऱ्यांची नेमकी मागणी काय?

Nashik Farmers on Onion News: नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून सरकारच्या कांदा महाबॅंक निर्णयाचा विरोध.

Uday Satam

सरकारची कांदा महाबॅंकची घोषणा..... नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारच्या ह्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. महाबॅंक नको, तर निर्यात बंदी उठवा, कांद्याला योग्य तो भाव द्या, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कांदा महाबँकेच्या माध्यमातून सरकार विद्युत किरण प्रक्रियेचे युनिट उभे करणार आहे. यावर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे. तर सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निर्णय घेतला असल्याची टीका शेतकऱ्यांकडून केली जात आहे. २० वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते लासलगावमध्ये विद्युत किरण प्रक्रिया राबवण्यात आली होती. कांदा विद्युत किरण केंद्रात नेण्याचा आणि आणण्याचा वाहतूक खर्च तसेच अन्य प्रक्रिया परवडणारी नसल्याने शेतकऱ्यांनी केंद्राकडे पाठ फिरवली होती. तीच योजना आता सरकारने पुन्हा आणली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सरकारच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यानंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT