सोयाबीनला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी मुंबईत मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. यावेळी हमीभाव मिळवा म्हणून शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत सोयाबीन मंत्रालयाबाहेर टाकण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.
सोयाबीन पिकाला 6 हजारांचा हमीभाव मिळाला पाहिजे. सध्या मिळणाऱ्या हमीभावात शेतकऱ्यांचा खर्च देखील निघत नाही. यासाठी आम्ही अनेकवेळा निवेदन देखील दिलं आहे. तरीही यावर कोणताच तोडगा काढण्यात आलेला नाही. म्हणून आज संतप्त शेतकऱ्यांनी मंत्रालयासमोर आंदोलन करण्यास सुरुवात केली. सरकारने शेतकऱ्यांचा अंत बघू नये, सोयाबीनला 6 हजारप्रमाणे हमीभाव द्यावा अशी मागणी यावेळी या शेतकऱ्यांनी केली आहे. मंत्रालयाबाहेर सोयाबीन फेकून हे आंदोलन करण्यात आलं आहे. त्यांनंतर आता पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.