छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये असणाऱ्या खादगाव येथे चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांच्या धमकीने घाबरलेल्या शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादाय घटना घडलीय,संजय शेषराव कोहकडे (वय ४५) असे आत्महत्या करणारे शेतकऱ्याचे नाव आहे. संजय शेषराव कोहकडे यांची खादगाव- खेर्डा रस्त्यावर शेतजमिन आहे. रस्ता कामासाठी संबंधीत ठेकेदाराने खोदलेल्या दुतर्फा नालीद्वारे पावसाचे पाणी शेतात येऊन पिकाची नासाडी होत असल्याने शेतात येणारे पाणी बंद करण्यासाठी शेतकऱ्याने केलेल्या तक्रारीन्वये घटनास्थळ पाहणी व पंचनामा करण्यासाठी आलेल्या तलाठी व मंडळाधिकाऱ्याने प्रतिवादी शेतकऱ्याशी संगनमत करून उलट तक्रारदार शेतकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याने अपमानित झालेल्या संबंधित तक्रारदार शेतकऱ्याने पंचनामा सुरू असतांना अधिकारी - कर्मचारी व ग्रामस्थासमोरच विहारीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना पैठणच्या खादगाव मंगळवार दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली असून मयताच्या नातेवाईकांनी मंडळाधिकारी, तलाठी व प्रतिवादी शेतकऱ्याविरुद्ध जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत उत्तरणीय तपासणी व अंत्यसंस्कारास हरकत घेत पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयासमोर ठिय्या मांडला. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले नंतर नातेवाईकांनी संजय कोहकडे याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. आमच्या वर अन्याय झालाय सर्वांवरती गुन्हे दाखल करा अशी मागणी आता कुटुंबियांनी केली आहे, संजय कोहकडे यांच्या कुटुंबाची पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी भेट घेतली असून मी एक सरकारचा प्रतिनिधी म्हणून जी काही मदत करता येईल ती करूत कसे त्यांनी म्हटले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.