Solapur Crime Branch officers arrest fake godman Mohammad Kadar Shaikh in ₹1.87 crore secret treasure scam case. Saam Tv
Video

गुप्तधनाचा हंडा काढून देतो म्हणणाऱ्या भोंदू बाबाकडून कोट्यवधींची फसवणूक|VIDEO

Solapur Fraud: सोलापूरमध्ये गुप्तधन काढून देतो असा बनाव रचत तब्बल १ कोटी ८७ लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला पोलिसांनी अटक केली आहे.

Omkar Sonawane

सोलापूरमध्ये गुप्तधन काढून देतो असा बनाव रचत तब्बल 1 कोटी 87 लाखांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाला अखेर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. मोहम्मद कादर शेख असे या फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबाचे नाव असून, कर्नाटकातील विजापूर येथून सोलापूर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद कादर शेख याने सोलापुरातील गोविंद वंजारी यांना जमिनीत गुप्तधन लपवलेलं आहे, ते मी काढून देतो असा विश्वास बसवून त्यांच्याकडून मोठी रक्कम घेतली. मात्र काही दिवस उलटल्यानंतर वंजारी यांना फसवणुकीचा संशय आला आणि त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली.

तक्रार दाखल होताच सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे यांच्या नेतृत्वाखालील गुन्हे शाखेच्या पथकाने कसून तपास करून विजापूर येथे सापळा रचला आणि आरोपीला त्याच्या राहत्या घरातून अटक केली.

पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आलं आहे की, मोहम्मद कादर शेख याने याआधीही सोलापूर परिसरात अशाच प्रकारे अनेकांची फसवणूक केली आहे. पोलिस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, आणखी काही बळी पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: बहिणीच्या दिराने पळवून नेलं, अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध; गरोदर पीडितेला रेल्वे स्टेशनवर सोडून पळाला

Anil Ambani : अंबानींवर ईडीची मोठी कारवाई, ३००० कोटींची संपत्ती जप्त, फ्लॅट, प्लॉट अन् ऑफिसला कुलूप

Maharashtra Live News Update: 'सरकारने शेतकऱ्यांची थट्टा लावली आहे' - उद्धव ठाकरे

'६,५०० रूपयातील साडेचार मॅडमच्या खात्यात पाठव'; शेतकऱ्याच्या अनुदानावर शासकीय कर्मचाऱ्याचा डोळा, Audio क्लिप व्हायरल

Bank Holidays : नोव्हेंबरमध्ये तब्बल ११ दिवस बँका बंद, डिजिटल सेवा मात्र २४ तास सुरू राहणार | VIDEO

SCROLL FOR NEXT