EV charging station AI Images
Video

Mumbai News: मुंबईतील सर्व इमारतींसाठी EV चार्जिंग स्टेशन आता अनिवार्य|VIDEO

New Rule EV Charging Stations a Must: मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता मुंबईतील सर्व नव्या इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन असणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

Omkar Sonawane

मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता मुंबईतील सर्व नव्या इमारतींमध्ये इलेक्ट्रिक वाहन (EV) चार्जिंग स्टेशन असणे बंधनकारक करण्यात येणार आहे. जर इमारतीत EV चार्जिंग स्टेशन नसेल, तर संबंधित इमारतीला 'नाहरकत प्रमाणपत्र' (NOC) मिळणार नाही, अशी माहिती मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

नगरविकास विभाग विकास नियंत्रण नियमावलीत (DCR) यासंदर्भात आवश्यक दुरुस्ती करण्याच्या प्रक्रियेत आहे. यानुसार, बांधकाम व्यावसायिकांना इमारतीचे नियोजन EV चार्जिंग स्टेशनच्या सोयीसहच करावे लागणार आहे. अन्यथा अशा इमारतींना अधिकृत मान्यता नाकारण्यात येईल.

सध्या अस्तित्वात असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांसाठी देखील नवा नियम लागू करण्यात येणार आहे. अशा सोसायट्यांमध्ये EV चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी एकूण सभासदांपैकी किमान 50 टक्के सभासदांची मान्यता आवश्यक राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT