Assembly Election SaamTv
Video

Assembly Election : महाराष्ट्रात विधानसभेचं महाभारत; आज आचारसंहिता लागणार

Saam Tv

विधानसभा निवडणुकीचं बीगुल आज वाजू शकतं. आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून यात आचारसंहिता आणि विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. आजपासून आचारसंहिता लागू होणार असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे. तर झारखंड आणि महाराष्ट्राच्या निवडणूका एकत्रित होणार आहेत. राज्यातील विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपच्या 105 जागा आहेत. तर शिंदे गटाच्या 40 जागा आहेत. अजित पावर यांच्या राष्ट्रवादीच्या 42 जागा आहेत. तर महाविकास आघाडीत ठाकरे गटाकडे 16 जागा आहेत. शरद पावर यांच्या राष्ट्रवादी गटाकडे 12 जागा आहेत आणि कॉंग्रेसकडे 44 जागा आहेत. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये नेमकं जागा वाटप कसं होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. यात मित्र पक्षांचा सुद्धा सगळ्यांना विचार करावा लागणार आहे.

आचारसंहिता लागल्यानंतर नेहेमी पेक्षा कमी कालावधी यावेळी मिळणार आहे. 45 दिवसांच्या एवजी यावेळी 40 दिवसांचा कालावधी प्रचारासाठी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आजपासून महाराष्ट्रात विधानसभेचं महाभारत नेमकं कसं सुरू होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Date Live Update : महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान तर २३ तारखेला मतमोजणी: मुख्य निवडणूक आयुक्त

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले! २० नोव्हेंबरला मतदान, २३ तारखेला निकाल, EC कडून घोषणा

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूर कोणाच्या पडली प्रेमात? 'त्या' चर्चांना वेध

Solapur News : बार्शी पंचायत समितीच्या माजी सभापतीवर अँटीकरप्शनची कारवाई; पत्नी, मुलाच्या नावाने बेहिशोबी मालमत्ता

IND vs NZ Weather Update: भारत- न्यूझीलंड सामना रद्द होणार? वाचा बंगळुरुतील हवामानाच अंदाज

SCROLL FOR NEXT