IND vs NZ Weather Update: भारत- न्यूझीलंड सामना रद्द होणार? वाचा बंगळुरुतील हवामानाच अंदाज

India vs New Zealand Weather Update: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमधील पहिल्या कसोटी सामन्याचा थरार बंगळुरुत रंगणार आहे.
IND vs NZ Weather Update: भारत- न्यूझीलंड सामना रद्द होणार? वाचा बंगळुरुतील हवामानाच अंदाज
ind vs nz twitter
Published On

India vs New zealand weather Update: भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे.

या सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडू कसून सराव करताना दिसून येत आहेत. मात्र सामन्यापूर्वीच दोन्ही संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे. या सामन्यातील ५ पैकी ४ दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हा सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यातील ५ पैकी ४ दिवस पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना ५ दिवसांचा सामना पाहण्याची संधी मिळणार नाही. सामन्यातील ४ दिवस जोरदार तर १ दिवस पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे या सामन्यातही क्रिकेट चाहत्यांना सामना सुरु होण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

IND vs NZ Weather Update: भारत- न्यूझीलंड सामना रद्द होणार? वाचा बंगळुरुतील हवामानाच अंदाज
IND vs BAN मालिकेसह या खेळाडूची कारकीर्दही संपली! आधीच केली होती निवृत्तीची घोषणा

कुठल्या दिवशी किती टक्के पाऊस पडणार?

या सामन्यातील पहिला दिवस १६ ऑक्टोबरला असणार आहे. पहिल्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ४१ टक्के इतकी असणार आहे. तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही २५ टक्के इतकी असणार आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ६७ टक्के इतकी असणार आहे. तर चौथ्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता २५ टक्के आणि शेवटच्या दिवशी पाऊस पडण्याची शक्यता ही ४२ टक्के इतकी असणार आहे.

IND vs NZ Weather Update: भारत- न्यूझीलंड सामना रद्द होणार? वाचा बंगळुरुतील हवामानाच अंदाज
IND vs NZ: सरफराज की राहुल? पहिल्या कसोटीसाठी रोहित कोणाला देणार संधी; पाहा प्लेइंग ११

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा.

न्यूझीलंड- टॉम लेथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), माइकल ब्रेसवेल (पहिल्या कसोटी सामन्यासाठी), मार्क चेपमन, डेव्हॉन कॉनवे, मेट हेनरी, डेरिल मिशेल, विल ओ'रूर्के, मिशेल सँटनर, बेन सियर्स, ईश सोढी (दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी), टिम साउदी, केन विलियमसन, विल यंग, अजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com