निवडणुक आयोगाने विधानसभा निवडणुकीची घोषणा करताच महाराष्ट्रात राजकिय हालचालींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये आज रात्री वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक होण्याची शक्यता आहे. कमी दिवस असल्याने आजच्या बैठकीत जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचे सूत्र आजच्याच बैठकीत ठरणार सूत्रांची माहिती आहे.
निवडणुका जाहिर झाले आहेत, आम्ही या निवणुकांना सामोरे जाण्यासाठी सज्ज आहोत. मुख्यमंत्र्यांनी सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे जनता आम्हाला कौल देईल. जागा वाटपाबाबत महायुतीत कुठलाही तेढ नाही. बहुतांश जागांबाबत चर्चा झालेली आहे. लवकरच तीनही पक्षातील नेते जागा वाटपबाबत घोषणा करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे विरोधकाच्या पायाखालची जमीन सरकली आहे. पराभव समोर दिसू लागल्यामुळेच संजय राऊत अशी वक्तव्य करत आहेत.
लोकशाहीतील सर्वोच्च महोत्सवाची आज घोषणा झाली. दिवाळीत प्रकाश पर्व असेल आणि पाठोपाठ दुसरे विकासाचे प्रकाशपर्व आपण २० नोव्हेंबरला एकत्र साजरे करू भाजपच्या नेतृत्त्वात आपण २०१४, २०१९ ला भरभरून यश दिले. संपूर्ण बहुमत दिले. चला पुन्हा सारे मिळून सोबत येऊ या आणि २३ नोव्हेंबरला महायुतीच्या विजयाचा जल्लोष करू या. या लोकउत्सवात आपणही सारे मोठ्या संख्येने सहभागी व्हा! विकासासाठी महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाची आणि भक्कम जनादेशाची वाट बघतोय, अशी पोस्ट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर केलीय.
राज्याची जनता आतुरतेने वाट बघत होती. निवडणूक होते आहे याचा आनंद आहे. हरियाणा हरले असते तर निवडणुकीवर परिणाम झाला आता राष्ट्रपती राजवट देखील लागली असती. हरियाणामध्ये भाजप जिंकाल म्हणून निवडणुका लागल्या असते.
महाराष्ट्रातील नांदेडसह, तमिळनाडू येथील वाडनाडमध्ये लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे.
विधानसभा निवडणुकांसोबतच पोटनिवडणुका देखील होणार आहेत. महाराष्ट्रातील नांदेड लोकसभेसाठी देखील मतदान होणार. वसंतराव चव्हाण यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती. 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 तारखेला मतमोजणी होणार आहे.
महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. राज्यात २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मत मोजणी होणार आहे.
महाराष्ट्र निवडणुकीत ज्येष्ठ नागरिकांना विशेष सुविधा दिली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी आलेल्या मतदारांन बसण्यासाठी खुर्च्यांची सुविधा पुरवली जाणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना घरून मतदान करण्याची सुविधा पुरवली जाणार आहे. ज्या मतदारांचे वय ८५ पेक्षा जास्त आहे, त्यांना घरून मतदान करता येणार आहे.
महाराष्ट्रात 1 लाख 186 निवडणूक केंद्र आहेत
ग्रामीण आणि शहरी भागात मतदार केंद्र आहेत.
महाराष्ट्रातील आदिवासी भागातील जनतेशी आयोगाने चर्चा केली आहे.
त्यांचा टक्का जास्तीत जास्त असावा यासाठी आमचा प्रयत्न आहे.
आज विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जात आहे. महाराष्ट्रासह झारखंडमधील निवडणुकांची देखील घोषणा होणार आहे.
काही क्षणात विधानसभेच्या निवडणुकीचं बिगुल वाजणार आहे. तर काही क्षणात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी मनोज जरांगे पाटील यांनी मोठी मागणी केली आहे. 'काही वेळात आचारसंहिता लागू शकते, सरकारला शेवटचा इशारा आहे. फडवणीस साहेब अंमलबजावणी करा, आचारसंहिता पुढे ढकला. मराठ्यांच्या पोरांचं वाटोळ करू नका. मराठा जात संपवण्याचा विडा उचलू नका. तुम्ही स्वप्नपूर्ती करू नका की, मी मराठ्यांचं वाटोळं केलं. मराठ्यांचं वाटोळे केलं म्हणून कलंक लावून घेऊ नका,मराठ्यांना आरक्षण द्या,असे जरांगे म्हणाले.
दोन फेजमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत मुख्य लढत आहे. हरियाणात आम्हाला चांगले यश मिळाले. तिथे काँग्रेस येईल असे रिपोर्ट होते मात्र आम्ही आलो. महाराष्ट्रात मविआ येणार असल्याचे बोलले जाते मात्र वातावरण बदलले आहे. महाराष्ट्रात आम्हाला यश मिळेल, असे रामदास आठवले म्हणाले.
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेच्या पार्श्वभूमीवर आज होणारी महायुतीची पत्रकार परिषद पुढे ढकलण्यात आली आहे.
आचारसंहिता जाहीर होत आहे, निवडणुका देखील जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. याआधीच निवडणूक होईल असे वाटत होतं पण तसं झालं नाही. आमच्या पक्षाची तयारी पूर्ण झाली आहे, असे अमोल कोल्हे म्हणाले.
राज्यात आज आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता असल्याने मंत्र्यांची उद्घाटने आणि भूमीपूजनसाठी धावपळ सुरू आहे. महाराष्ट्र सरकार तर्फे मुंबईत पुण्य श्लोक अहिल्यादेवी भवन बांधण्यात येत आहे. मुंबईच्या मानखुर्द परिसरात हे भवन उभे राहणार आहे. आज यचा गडबडीने भूमीपूजन सोहळा करण्यात आला. या सोहळ्यासाठी पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते. मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समिती मार्फत ४७ कोटी रुपये खर्च करून मानखुर्द येथे बाल कल्याण विभागाच्या जागेवर हे भवन उभारले जाणार आहे. या भवनात अहिल्या देवींचा पूर्णकृती पुतळा, महिला आणि बाल कल्याण विभागाची विविध कार्यालय, सभागृह , महिलांना मार्गदर्शन केंद्र, विश्राम गृह अश्या विविध सुखसुविधा असणार आहेत.या भवनासाठी आमचे सरकार आल्यावर १०० कोटी ही देवू, हे भवन मतांचा नाही भावनेचा विषय असल्याचे लोढा म्हणाले.
विधानसभेच्या एकूण जागा २८८
महायुतीकडे सध्या १८७ जागा
भाजप - १०५
शिवसेना (एकनाथ शिंदे) - शिंदे ४०
राष्ट्रवादी (अजित पवार) -४२
महाविकास आघाडी ७२ जागा -
काँग्रेस - ४४
शिवसेना ठाकरे गट - १६
राष्ट्रवादी शरद पवार - १२
EC Assembly Elections Poll Date Annoucemnt Live: महाराष्ट्र झारखंडमध्ये आजपासूनच लागणार विधानसभेची आचारसंहिता ..दुपारी केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद .
Election date announcement live: नशीब निवडणूक लागली, ही चांगली गोष्ट आहे. कारण की आम्हाला वाटलं की निवडणूक लांबणीवर टाकली जाते की काय?
जशी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक लांबवली गेली तशी ही निवडणूक पुढे ढकली जाते की काय? असा संशय होता, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.