Election Commission officials conducting house-to-house voter verification ahead of upcoming polls in Maharashtra. Saam Tv
Video

Duplicate Voter Verification: निवडणुकांच्या तारखा लवकरच? दुबार मतदारांना चाप, आयोगाचे घरोघरी तपासणीचे आदेश|VIDEO

EC house-To-House Voter List Verification: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. प्रत्येक घरात जाऊन दुबार मतदारांची तपासणी करून त्यांना वगळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Omkar Sonawane

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी एक मोठं पाऊल उचललं आहे. 'मतदार याद्यांमधील दुबार नावं शोधा आणि त्यांचे दुबार मतदार रोखा' असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगानं स्थानिक निवडणूक संस्थांना दिले आहेत. याअंतर्गत, प्रत्येक बूथवर विशेष मोहीम राबवून घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले जाणार आहे. मतदारांची नावे एकाच यादीत असल्याची खात्री करणे आणि दुबार नावे वगळणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी निवडणुकांमध्ये कोणताही मतदार एकापेक्षा जास्त वेळा मतदान करू शकणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी ही देशव्यापी मोहीम महत्त्वाची ठरणार आहे.

मतदार यद्यांमधील दुबार नावे हटवून मगच निवडणुका घ्या,अशी मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली असतानाच आता राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांना ही दुबार नावे शोधा आणि दुबार मतदान होणार नाही याची खात्री करा,असे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहे. नगरपालिकांच्या निवडणुका 6 किंवा 7 नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato chutney Recipe : चमचाभर टोमॅटोची चटणी जेवणाची रंगत वाढेल, वाचा रेसिपी

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

SCROLL FOR NEXT