CM Eknath Shinde Saaam Tv
Video

Eknath Shinde : बंडातून धडा, एकनाथ शिंदेंचं सावध पाऊल, आमदारांकडून लिहून घेतले प्रतिज्ञापत्र!

उद्धव ठाकरे यांच्यानंतर Eknath Shinde यांनीही आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली, शिवसेना आमदारांकडून प्रतिज्ञापत्र घेतली आहेत.

Namdeo Kumbhar

eknath shinde shivsena : गतवेळी झालेल्या शिवसेनेतील बंडातून मोठा धडा घेत, ठाकरेंकडून आमदारांची बैठक बोलवत त्यांच्याकडून पाठींब्याबाबतची प्रतिज्ञापत्र लिहून खबरदारी घेतली जात आहे. आता एकनाथ शिंदे यांनीही जबाबदारीचे पाऊल उचलले आहे.

शिवसनेतील बंडाच्या केंद्रस्थानी राहिलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही सध्या प्रत्येक पाऊल जबाबदारीने टाकत आहे. ठाकरेंपाठोपाठ शिंदेंनीही आपल्या आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतली आहेत. पक्षात पक्षातील मुख्यनेते यांचा निर्णय अंतिम राहणार असून या निर्णयाशी सर्व आमदार बांधिल असणार आहेत.

पक्षातील सर्व नियम व अटी त्याचबरोबर पक्ष शिस्तीचे पालन केले जाईल असा आशय या प्रतिज्ञा पत्रात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ताज लॅड्स येथे झालेल्या बैठकीत सर्व आमदारांनी गट नेता म्हणून एकमताने एकनाथ शिंदेंची निवड करत, सर्व अधिकार एकनाथ शिंदेंकडे सोपवले.

मात्र तरीही शिंदेकडून आमदारांची प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यात आली आहेत. भविष्यात ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुर्नरावृत्ती होऊ नये याबाबत ही खबरदारी घेतली जात आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetty : वचन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा; राजू शेट्टी यांची मागणी

RBI Governor Shaktikanta Das: आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालं?

Mumbai Local : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, पुढच्या महिन्यात एसी लोकल धावणार, १२ फेऱ्या वाढणार

Pune Temple : पुण्यातील 'या' मंदिरात एकदा गेलात तर गाभाऱ्यातून पाय निघणार नाही

Maharashtra News Live Updates: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री होऊ नये - रामदास आठवले

SCROLL FOR NEXT