Eknath Shinde  saam tv
Video

VIDEO : एकनाथ शिंदेंना ठाण्यात जोरदार धक्का; टेंभीनाक्यावरच बंडखोरीची पहिली मशाल पेटली

Thane Election : बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच एकनाथ शिंदेंना मोठा धक्का बसला आहे. शिंदे यांचा अत्यंत जवळचा कार्यकर्ता अशी ओळख असलेल्या स्थानिक नेत्यानंच टेंभी नाक्यावरून बंडाचं निशाण फडकावलं आहे.

विकास काटे, साम टीव्ही, ठाणे

विकास काटे, ठाणे | साम टीव्ही

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच मोठा धक्का बसला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शिंदेसेनेत बंडखोरीची पहिली मशाल पेटली आहे. शिंदे यांचे अत्यंत जवळचा समजल्या जाणाऱ्या टेंभी नाका शाखा प्रमुखानंच बंडाचं निशाण हाती घेतलं आहे.

शिंदे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे निखिल बुडजडे टेंभी नाका शाखाप्रमुख. ठाणे महापालिका निवडणुकीत शिंदे सेनेकडून उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. पण त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. मी अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करत आहे. त्यामुळे मला निवडणूक लढवायची होती. अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचंही बु़डजडे यांनी सांगितलं होतं. त्यानुसार, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझी कुणावरही नाराजी नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. टेंभीनाक्यावरूनच शाखाप्रमुखानं बंडखोरी केल्यानं शिंदेंसमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे, असं मानलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad Tourism : पांढरी वाळू अन् निळेशार पाणी; रायगडमधील मनमोहक किनारा, परफेक्ट लोकेशन काय?

Maharashtra Live News Update: अहिल्यानगर महापालिकेत ६ फेब्रुवारीला होणार महापौर-उपमहापौर पदाची निवड

Jhumka Latest Designs: तरुणी पडल्या 'या' झुमक्याच्या प्रेमात, 'हे' आहेत लेटेस्ट पॅटर्न्स

Prathamesh Kadam: आत्महत्या की डेंग्यू...; मैत्रिणीने सांगितलं मराठी रिलस्टार प्रथमेशच्या मृत्यूचं खरं कारण

Beetroot Chips Recipe : बटाटा, केळी नव्हे एकदा ट्राय करा बीटरूट चिप्स, चवीला लय भारी

SCROLL FOR NEXT