Shinde Meets Amit Shah Saam TV News
Video

'मला CM करा, आमचा गट भाजपात विलिन करतो..' एकनाथ शिंदे दिल्लीला का गेले? ठाकरे गटाच्या खासदारानं सांगितलं कारण..

Shinde Meets Amit Shah: एकनाथ शिंदे यांनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. मुख्यमंत्री पदासाठी भाजपाला ऑफर दिल्याचा दावा संजय राऊत यांनी केला. शिंदे गट भाजपात विलिन होणार? चर्चा रंगली.

Bhagyashree Kamble

पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. शिंदे नेमके दिल्लीला का गेले? यावरून अनेक तर्कवितर्क लावण्यात येत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेमकी काय चर्चा झाली? यावर खासदार संजय राऊतांनी मोठा दावा केला आहे. अमित शहांची भेट घेऊन शिंदेंनी भाजपाला ऑफर दिली असून, आपल्याला मुख्यमंत्री करा, अशी मागणीही केली, असा दावा राऊतांनी केलाय.

' गुरूपौर्णिमेच्या निमित्ताने एकनाथ शिंदे यांचा आधीच प्लान ठरला होता. यावेळी शिंदेंनी शहांच्या पायावर डोकं ठेवलं. पायाला चंदन लावून फुलं ठेवली. त्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची तक्रार केली. शिंदेंनी त्यांना एक ऑफर दिली. मराठी माणसाची एकजुट तुटली नाही तर,आपल्यासाठी धोकादायक ठरेल. मला मुख्यमंत्री केल्यावर उपाय निघेल. त्यावर शहांनी मुख्यमंत्री भाजपाचाच असेल असं सांगितलं. त्यावर शिंदेंनी, माझ्यासह संपूर्ण गट मी भाजपात विलिन करायला तयार आहे', असा गौप्यस्फोट प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊतांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT