विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेत घडामोडीना वेग आला असून एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत कोकणातील नेते आणि आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे, निलेश राणे आणि मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. रायगड विधानपरिषदेची जागा राष्ट्रवादीला गेल्यानंतर सर्व आमदार आणि नेत्यांशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चा केली. शिवसेनेच्या आमदार आणि नेत्यांनी युती धर्म पाळावा अशी सूचना एकनाथ शिंदे यांनी केली.
राष्ट्रवादीकडून खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे. उद्या अनिकेत तटकरे हे उमेदवारी अर्ज दाखल करणार असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे नेते देखील उपस्थित राहणार आहे. मागच्या दोन वर्षांपासून रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसून विधानपरिषदेची जागा महायुतीमध्ये राष्ट्रवादीला गेल्यानंतर आता पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळणार असल्याचे बोलले जात आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते महेंद्र दळवी यांची मुलगी जुईल दळवी या आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचा निर्णय देखील या बैठकीमध्ये झाला आहे. तर याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेऊ नये अशा सूचना देखील दिल्याने मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.