ED officials conduct search at Mumbai locations linked to the Mithi River desilting scam involving ₹47 crore fraud Saam Tv
Video

Ed Raids in Mumbai : ईडीची मोठी कारवाई! मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी ८ ठिकाणी छापे, ४७ कोटींचं घबाड|VIDEO

ED Raids BMC Contractors: मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली असून, ८ ठिकाणी छापे टाकून ४७ कोटींच्या मालमत्ता जप्त केली आहेत.

Omkar Sonawane

मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) 31 जुलै 2025 रोजी मुंबईत ८ ठिकाणी अनुक्रमिक शोधमोहीम राबवली. ही कारवाई मुंबई झोनल कार्यालयाच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

ही कारवाई बीएमसीचे ठेकेदार आणि एका अभियंत्याच्या कार्यालय व निवासस्थानांवर करण्यात आली. संबंधित ठेकेदारांमध्ये अक्यूट डिझाइन्स, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, निखिल कन्स्ट्रक्शन कंपनी, एन. ए. कन्स्ट्रक्शन प्रा. लि., जे.आर.एस. इन्फ्रास्ट्रक्चर यांचा समावेश आहे. तसेच बीएमसी अभियंता प्रशांत कृष्ण तायशेटे यांच्या परिसरातही छापे टाकण्यात आले.

या शोध मोहिमेत बँक खाती, मुदत ठेव (FDR) आणि डिमॅट खात्यांमध्ये सुमारे ४७ कोटी रुपयांची रक्कम गोठवण्यात आली आहे. याशिवाय विविध अचल मालमत्तांशी संबंधित कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

ED च्या या कारवाईमुळे मुंबईतील मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याच्या चौकशीत मोठे धक्कादायक तपशील उघड होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : घराच्या जमिनीचे आणि प्रेमाचे प्रश्न सुटणार, वाचा रविवारचे राशीभविष्य

Ind vs Eng, 5th Test, Day 3: जैस्वालचा 'यशस्वी' धमाका, जडेजा, वॉशिंगटनची 'सुंदर' खेळी, भारताचं इंग्लंडला 374 धावांचं आव्हान

Pigeons: मुंबईतील कबुतरखान्यावरून नवा वाद; नेमकं कारण काय? मुंबईत किती आहेत कबुतरखाने?

Raj Thackeray : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना हिंदीचा कळवळा; शेकापच्या मेळाव्यातून राज ठाकरेंचा हल्ला, VIDEO

Mumbai Crime : एकनाथ शिंदेंकडे तक्रार केली, तर...; 5 लाखांची खंडणी घेताना माजी नगरसेवकाला रंगेहाथ पकडलं

SCROLL FOR NEXT