मुंबई IIT मध्ये शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या, हॉस्टेलवरून उडी मारत संपवलं आयुष्य

Iit Bombay Student Rohit Sinha Dies by Suicide : मुंबईमध्ये रोहित सिन्हा या विद्यार्थ्याने आत्महत्या केली. IIT हॉस्टेल इमारतीवरून उडी घेत त्याने आयुष्य संपवलं. नैराश्य हे कारण असल्याचं बोललं जातं.
IIT Bombay student suicide from hostel building
IIT Bombay student suicide from hostel building
Published On
Summary
  • IIT मुंबईत २६ वर्षीय विद्यार्थ्याची आत्महत्या.

  • रोहित सिन्हा हा मेटा सायन्स शाखेतील अंतिम वर्षाचा विद्यार्थी होता.

  • हॉस्टेलच्या इमारतीवरून उडी घेत आयुष्य संपवलं.

  • नैराश्य हे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज; पोलिसांचा तपास सुरू.

IIT Bombay student suicide from hostel building : मुंबईच्या पवईमधील आयआयटी बॉम्बेमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक वृत्त समोर आले आहे. आयआयटीमधील हॉस्टेल इमारतीवरून उडी घेऊन विद्यार्थ्याने आत्महत्या केली. रोहित सिन्हा (२६) असे विद्यार्थीचे नाव आहे. रोहित आयआयटी मुंबईत मेटा सायन्सच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेत होता. रोहितने नैराश्यातून आयुष्य संपवल्याचे बोलले जात आहे. (IIT Mumbai meta science student dies by suicide)

आयआयटी मुंबईमध्ये ही घटना शुक्रवारी रात्री घडली. रोहितच्या मृत्यूने आयआयटी परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रोहित हा हॉस्टेलच्या टेरेसवरून खाली पडला आणि जागीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना प्राथमिक तपासात आत्महत्येची शक्यता वाटत असली, तरी अन्य कारणांचाही शोध घेतला जात आहे. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळली नाही. पोलिसांनी रोहितच्या मित्रांचे आणि हॉस्टेलमधील सहकाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि फॉरेन्सिक तपासणीद्वारे घटनेचा तपशील जाणून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. आयआयटी प्रशासनाने या घटनेबद्दल खेद व्यक्त केला असून, रोहितच्या कुटुंबियांना संपर्क साधण्यात आला आहे.

IIT Bombay student suicide from hostel building
Vande Bharat Express : पुण्यातून धावणार आणखी एक वंदे भारत, रेल्वे मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल, वाचा सविस्तर

प्राथमिक माहितीनुसार, रोहित सिन्हा हा विद्यार्थी आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण घेत होता. शैक्षणिक दबावामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा अंदाज आहे. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली असून, पवई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी सरकारी रुग्णालयात पाठवला आहे. आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिस रोहित सिन्हाचा मोबाइल, खोलीतील कागदपत्रे आणि इतर वस्तूंची तपासणी करत आहेत. आयआयटी प्रशासनाने या घटनेवर कोणतेही अधिकृत निवेदन दिलेले नाही. आयआयटीसारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शैक्षणिक तणावामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम आणि त्यामुळे घडणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांनी चिंता वाढवली आहे.

IIT Bombay student suicide from hostel building
बदलापूरमध्ये भयंकर अपघात, ट्रकने कारला चिरडले, दोन जणांचा मृत्यू, CCTV VIDEO पाहून पायाखालची जमीन सरकेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com