Drunk Pune police constable Hemant Iname’s car after crashing into six vehicles; victim Abhishek Pawar critically injured, family alleges police trying to suppress the case. Saam Tv
Video

Drunk Police Constable: मद्यधुंद पोलिसाची 6 गाड्यांना धडक, पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप|VIDEO

Pune Drunk Driving Case Police: पुण्यातील रांजणगाव पोलीस ठाण्यातील हेमंत इनामे या मद्यधुंद पोलीस कॉन्स्टेबलने सहा गाड्यांना धडक दिली. या अपघातात २२ वर्षीय अभिषेक पवार गंभीर जखमी झाला असून, त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांवर प्रकरण दडपण्याचा आरोप केला आहे.

Omkar Sonawane

पुणे: रांजणगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामे याने दारुच्या नशेत कारची धडक दिल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या जखमींमध्ये 22 वर्षांच्या अभिषेक पवार या तरुणाचा समावेश आहे. अभिषेकच्या डावा पाय दोन ठिकाणी फ्रॅक्चर झाला असुन त्याच्या छाती आणि पोटाला ही गंभीर जखमा झाल्यात. पुण्यातील एका हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

मात्र, अपघाताचं हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा अभिषेकच्या आईचा आणि नातेवाईकांचा आरोप आहे. अपघातानंतर पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेचा फोन अपघातस्थळी सापडला होता. मात्र त्याच्या बायकोने उपचारांचा खर्च देण्याचे आश्वासन देऊन तो फोन ताब्यात घेतला. मात्र त्यानंतर उपचारांचा खर्च देण्यास नकार दिला. अभिषेकच्या उपचारांसाठी मोठा खर्च येणार असुन तो ठेवणं शक्य नसल्याचं त्याच्या आईने म्हटलय. तर दुसरीकडे हा जामीनपात्र गुन्हा असल्याने यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल हेमंत इनामेला अटक करण्याची गरज नाही असं पुणे ग्रामीण पोलीसांनी म्हटलय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचा मास्टरस्ट्रोक; बड्या नेत्यासह ६ माजी नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश

Shocking: दुःख डोंगराएवढं! आजारी मुलानं बापाच्या कुशीत डोळे मिटले, धक्का सहन न झाल्यानं बापाचाही हार्ट अटॅकनं मृत्यू

Bus Fire : नाशिकच्या घटनेची पुनरावृत्ती! प्रवाशांनी भरलेल्या AC बसला आग लागली; 12 जणांचा मृत्यू

Antibiotics Side Effects: अँटिबायोटिक्स घेताहेत भारतीयांचा जीव? WHO च्या इशाऱ्याने भारतीयांमध्ये भीतीचे वातावरण

Pune Fight Video: डेक्कन चौकात दहशत! नदीपात्रातील चौपाटीवरील हॉटेलमध्ये मारामारी

SCROLL FOR NEXT