GAURI GARJE DEATH CASE saam tv
Video

Gauri Garje Case: 'श्रीमंताच्या नादी लागू नका, तुमची मुलगी गरीबाला द्या', डॉक्टर गौरीच्या वडिलांनी फोडला टाहो

Anant Garje Case: पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या बायकोने आत्महत्या केली. गौरी गर्जे यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली. आज पाथर्डी येथे त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गौरी यांच्या वडिलांनी टाहो फोडला.

Priya More

राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या बायकोने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली. याप्रकरणी अनंत गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्याला अटकही करण्यात आले. पोलिस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान आज डॉक्टर गौरी यांचे पार्थिव नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवडे गावात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. यावेळी पार्थिवासमोर गौरीच्या वडिलांनी हंबरडा फोडत 'जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या. तुमची मुलगी गरीबाला द्या. श्रीमंताच्या नादी लागू नका.', अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी डॉक्टर गौरी यांचे नातेवाईक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon Hydration: पावसाळ्यात थकवा, चक्कर आणि वाताचा त्रास वाढलाय? डॉक्टरांनी सांगितलेल्या या सवयी आत्ताच करा फॉलो

VIDEO : आता फक्त प्रधानांचा राजीनामा घेतलाय, उद्या सरकारही बदलतील; अभिजीत दिपकेंचा थेट इशारा

Hair Care: लहानपणी होते तसे दाट, लांबसडक आणि चमकदार केस हवेत? मग घरीच करा 'हा' सोपा उपाय

Maharashtra News Live Update: नालासोपारा येथील रिसॉर्टमध्ये दारूच्या पार्टीदरम्यान हवेत गोळीबार

मुगाची डाळ टाकून टाकळ्याची भाजी कशी बनवायची? सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT