Doctors marching in Solapur demanding a DJ-free and peaceful city Saam Tv
Video

आरोग्यसेवा ठप्प! डिजेमुक्त सोलापूरसाठी डॉक्टरांचा एल्गार, जिल्ह्यातील डॉक्टरांनी काढला मोर्चा | VIDEO

Health Hazards Of DJ Noise In Festivals: सोलापूर शहर डिजेमुक्त व्हावे, यासाठी डॉक्टरांचा मोठा मोर्चा काढण्यात आला. कर्णकर्कश डिजे आवाजाला विरोध करून पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Omkar Sonawane

सोलापुरात शहर डिजेमुक्त व्हावे यासाठी डॉक्टरांचा मोठा मोर्चा काढला गेला.

ऑफिसर्स क्लबपासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा पार पडला.

डॉक्टरांनी पारंपरिक वाद्यांवर भर देत शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

याआधी ज्येष्ठ नागरिकांनीही डिजेमुक्त सोलापूरसाठी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते.

सोलापूर: शहर डिजेमुक्त व्हावे, यासाठी जिल्ह्यातील डॉक्टरांनी मोठा मोर्चा काढला. हा मोर्चा ऑफिसर्स क्लबपासून पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत नेण्यात आला. याआधी काही दिवसांपूर्वी ज्येष्ठ नागरिकांनीही डिजेमुक्त सोलापूरसाठी रस्त्यावर उतरून आवाज उठवला होता. आता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनीही या चळवळीला पाठिंबा दिला आहे. सोलापूर हे उत्सवांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मात्र, डिजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे उत्सवांचं विद्रूपीकरण होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरत, कोणत्याही सण, जयंती किंवा उत्सवाला विरोध नसल्याचं डॉक्टरांच्या मोर्चातून स्पष्ट करण्यात आलं. या मोर्चाच्या माध्यमातून नागरिकांना आरोग्यदायी आणि शांततापूर्ण वातावरण राखत पारंपरिक पद्धतीने उत्सव साजरे करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rain Alert : महाराष्ट्रासाठी ४ दिवस महत्त्वाचे, वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळीचा अंदाज, IMD कडून या ठिकाणी 'यलो अलर्ट

Dhurandhar 2: 'धुरंधर २' मधील पात्रांची रिअल लाइफ झलक; दोन वर्षांच्या शोधानंतर मिळाली परफेक्ट कास्टिंग

Ashwini Bhide: मुंबईला मिळाल्या पहिल्या महिला आयुक्त, कोण आहेत IAS अश्विनी भिडे?

दिल्लीहून शिर्डीकडे येणारे विमान भरकटलं; हवेतच घिरट्या, नागरिकांची धावपळ|VIDEO

Maharashtra Live News Update: नंदुरबार जिल्ह्यात वादळीवारा आणि गारपीट; कांदा पिकाचे सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT