Police Accident News: डुक्कर आडवे गेल्याने घात झाला, पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस अधिकाऱ्याचा भयंकर अपघात, Video

Pune Solapur Highway: पुणे-सोलापूर महामार्गावर डुक्कर आडवे गेल्याने पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे यांची कार ट्रकला धडकली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी असून उपचार सुरू आहेत.
Police Accident News
Police Accident NewsSaam Tv
Published On

पुणे- सोलापूर महामार्गावर अचानक डुक्कर आडवे गेल्याने पोलीस उपनिरीक्षकाचे चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले व गाडी थेट दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात पोलीस उपनिरीक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

.

Police Accident News
Viral Video: 'कधीच कोणाला कमी समजू नका' कुत्र्यानं चढवला बिबट्यावर हल्ला, २०० मीटर फरफटत नेलं अन्...

सोरतापवाडी ग्रामपंचायत हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आज पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.महेश अंबादास गळगटे (वय- 36, रा. राममंदिर लेन, आष्टी, जि. बीड)असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. त्यांच्यावर लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश गळगटे हे बार्शी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक या दर्जाच्या पदावर कार्यरत आहेत. कामानिमित्त आपली चारचाकी गाडी घेऊन आले होते. आज पहाटे पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. यावेळी सोरतापवाडी हद्दीतील अल्फा पेट्रोल पंपासमोर आले असता त्यांच्या चार चाकी गाडीला अचानक डुक्कर आडवे गेले. दरम्यान, डुक्कर आडवे आल्याने ते चालवत असलेल्या चारचाकी गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडी थेट महामार्गावरील दुभाजक तोडून पुण्याच्या बाजूकडे निघालेल्या ट्रकला धडकली. या अपघातात गळगटे यांना गंभीर दुखापत झाली.

Police Accident News
Viral Video: किळसवाणा प्रकार! घरकाम करणाऱ्या महिलेने भांड्यातच केली लघवी, व्हिडीओ

दरम्यान, सदर अपघाताची माहिती मिळताच कदम रुग्णवाहिकेचे वैभव कदम व रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने गळगटे यांना गाडीच्या बाहेर काढून लोणी काळभोर येथील एका बड्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com