Viral Video
Viral VideoSaam Tv

Viral Video: किळसवाणा प्रकार! घरकाम करणाऱ्या महिलेने भांड्यातच केली लघवी, व्हिडीओ

Maid Urinating In Utensils Video: उत्तर प्रदेशातील बिजनोरमध्ये घरकाम करणाऱ्या महिलेनं भांड्यात लघवी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मोलकरणीला अटक केली आहे.
Published on

उत्तर प्रदेशच्या बिजनोरमधील नागीना परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. १० वर्षे एकाच घरात काम करणाऱ्या मोलकरणीचं किळसवानं कृत्य समोर आलं आहे. या मोलकरीण महिलेने घरामध्ये भांडी घासताना त्यावर लघवी केल्याचा प्रकार आहे. संबंधित प्रकाराची माहिती घरमालकाने पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आहे.

Viral Video
Viral Video: 'कधीच कोणाला कमी समजू नका' कुत्र्यानं चढवला बिबट्यावर हल्ला, २०० मीटर फरफटत नेलं अन्...

सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओतून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, घरकाम करणारी एक महिला भांडी धुताना त्यावर लघवी करताना दिसत आहे. यामुळेच तिच्या किळसवाण्या कृत्यानंतर महिलेला कामावरून काढून टाकण्यात आला आहे. तसेच येथील स्वच्छतेबाबत पूर्णत: प्रश्न उपस्थित होत आहे.

सदर महिला ही तेथे मागील १० वर्षापासून काम करत असल्याची माहिती आहे. यामुळेच महिलेनं केलेल्या या कृत्यामुळं विश्वासाला देखील तडा गेला आहे. स्वच्छता ही महत्वाची असल्याने या महिलेनं केलेल्या या कृत्यानं सर्वनाच धक्का बसला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर गुरूवारी पोलिसांनी महिलेचा शोध घेऊन तिला नगीना पोलिस स्टेशनमध्ये अटक केली असल्याची माहिती आहे.

Viral Video
Viral Video: महिलेचा अनोखा जुगाड; इस्त्रीने केस सरळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com