Viral Video: महिलेचा अनोखा जुगाड; इस्त्रीने केस सरळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Hair Straightening Viral Video: एका महिलेने केस सरळ करण्यासाठी इस्त्रीचा वापर केला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. मात्र यामध्ये मोठा धोका आहे.
Viral Video
Viral VideoSaam Tv
Published On

केस सरळ आणि मऊ असावेत असे प्रत्येक महिलेला वाटते. अनेकींना कुरळे केस आवडत नाही. केस सरळ होण्यासाठी त्या विविध प्रयोग करतात. पार्लरमध्ये केस सरळ होण्यासाठी स्ट्रेटनिंग केली जाते. मात्र अनेक महिलांसाठी स्ट्रेटनिंगचा खर्च मोठा आणि न परवडणारा असतो. अशावेळी महिला काय करतात याचा हा व्हिडीओ आहे जो पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल.

Viral Video
Viral Video: 'कधीच कोणाला कमी समजू नका' कुत्र्यानं चढवला बिबट्यावर हल्ला, २०० मीटर फरफटत नेलं अन्...

या व्हिडीओमध्ये एका महिलेने केस सरळ होण्यासाठी इस्त्रीचा वापर केला आहे. बेडवर ही महिला केस मोकळे सोडून झोपलेली दिसत आहे. महिलेच्या शेजारी एक व्यक्ती आहे जी तिचे केस इस्त्रीने सरळ करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. महिलेने तिचं तोंड लपवलेलं आहे. तर या व्यक्तीच्या हातात कंगवा आणि इस्त्री दिसत आहे. इस्त्री त्याने केसांवर फिरवलेली आहे. यानंतर महिलेचे केस सरळ होतील की नाही हे पाहाच.

केस सरळ होण्यासाठी इस्त्रीचा वापर केल्याने घातक देखील ठरू शकते. यामुळे केस जळण्याची तसेच इस्त्रीमुळे करंट लागण्याची देखील शक्यता आहे. यामुळे अश्या कोणत्याही गोष्टी करताना योग्य काळजी घेणे महत्वाचे आहे.@sivaakhilaworld2000 या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Viral Video
Old Railway Tickets Viral: 'आयुष्यात शेवटी आठवणीच राहतात' रेल्वेच्या जाड पुठ्यांची तिकीटे पाहून तुम्हीही व्हाल भावूक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com