Dhule Flood Saam Tv
Video

Dhule Flood: अतिवृष्टीचा फटका! डोळ्यासमोर ५ एकर पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने फोडला टाहो

Dhule Rainfall: धुळ्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. एका शेतकऱ्याचे ५ एकरवरील पीक उद्ध्वस्त झाले. त्यामुळे या शेतकऱ्याने हंबरडा फोडला.

Priya More

धुळ्यात गेल्या २ दिवसांपासून पावसाने कहर केला आहे. या पावसामुळे तासाभरात होत्याचं नव्हतं झालं. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला. त्यामुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. जोरदार झालेल्या पावसाने डोळ्यादेखत ५ एकर मधील संपूर्ण शेवगा पिक उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याने हंबरडा फोडला. आता या संकटातून पुन्हा कसं उभं राहणार असा प्रश्न सरकारला पडला आहे.

सावकारी कर्ज आणि बँकेच कर्ज फेडण्याची ताकद उरली नसून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची प्रतिक्राय शेतकऱ्याने दिली आहे. मायबाप सरकार लक्ष देत नसल्यामुळे आत्महत्या करणेच सोपा उपाय असल्याची भावना शेतकऱ्याने व्यक्त केली. धुळे तालुक्यातील वडेल शिवारात रामदास मोरे या शेतकऱ्याचं उभं पिक पावसामुळे डोळ्या समोर आडवं झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यानं रस्त्यावर लोळण घातली, टाहो फोडला, पण सत्ताधारी आमदार कारमध्येच बसून राहिला | VIDEO

Asia Cup 2025 Trophy : नकवीच्या हाती शेवटची बघितलेली आशिया कप ट्रॉफी आता आहे कुठे? अचूक माहिती आली समोर

Maharashtra Live News Update: शेतकरी अतिवृष्टीने हैरान अन् आमदार संजय बनसोडे दांडियाच्या कार्यक्रमात सहकुटुंब व्यस्त

Walking Mistakes: वॉकिंग करताना कधीही 'या' ५ चुका करू नका, अन्यथा फायद्याऐवजी होईल नुकसान

Smita Shewale: तीन वेळा मला ही भूमिका...; प्रसिद्ध अभिनेत्रीला साकारायचंय 'हे' खास पात्र, इच्छा व्यक्त करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT