Sakshi Sunil Jadhav
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सशक्तीकरणासाठी नवी योजना सुरू केली आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना याचा थेट फायदा मिळणार आहे.
महिला व बालकल्याण विभागाने मुंबई बँकेच्या सहकार्याने व्याजमुक्त कर्ज योजना जाहीर केली.
महिलांना छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी १० हजार ते १ लाख रुपये पर्यंत कर्ज उपलब्ध होईल.
ही सुविधा फक्त त्याच महिलांना मिळेल, ज्या आधीपासून महिन्याला १,५०० रुपये मानधन घेत आहेत.
तसेच या योजने अंतर्गत महिलांना वैयक्तिकरित्या किंवा २ ते १० सदस्यांच्या गटातून कर्ज घेता येईल.
खास बाब म्हणजे कर्जाच्या हप्त्यासाठी वेगळे पैसे भरावे लागणार नाहीत. मानधनातूनच हप्ते वजा होतील.
योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य करण्यात आले असून त्याद्वारे खरी लाभार्थी महिलांची ओळख निश्चित होईल. या कर्जातून महिला शिलाई, ब्युटी पार्लर, दुकान यांसारखे छोटे व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनू शकतील.