Devendra Fadnavis On CM Post saam tv
Video

Devendra Fadnavis : ...तर पुढची १०० वर्षे मलाच मुख्यमंत्री ठेवतील, फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया

Devendra Fadnavis statement on Bawankule Remark On CM post : २०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहतील, असं विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यावर स्वतः फडणवीस यांनीच मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

देवेंद्र फडणवीस हे २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहतील, असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं होतं. त्यामुळं राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. याबाबत माजी मुख्यमंत्री आणि महायुतीतील महत्वाचा घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांना माध्यमांनी विचारणा केली असता, त्यांनी दोन्ही हात जोडून त्यांना शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया दिली होती. बावनकुळेंच्या वक्तव्याबाबत आता स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

बावनकुळे यांनी ठरवलं तर, ते पुढची १०० वर्षे मलाच मुख्यमंत्री म्हणून ठेवतील, अशी मिश्किल प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली. ते पुण्यात बोलत होते. दरम्यान, महाराष्ट्र पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह आणि त्यांच्या कामावर संशय घेणारं वक्तव्य शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी केलं होतं. त्यावर विचारलं असता, फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे इशारा दिला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी संजय गायकवाड यांच्याबाबत चर्चा करणार आहे. त्यांनी संजय गायकवाड यांना कडक शब्दांत समज द्यावी. हे असं वारंवार चालणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IPS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! १७९ आयपीएस अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या; कुणाची कुठे झाली नियुक्ती?

Cycling Benefits: रोज २० मिनिटं सायकलिंग करा; वजन कमी करण्यासह मिळतील हे ७ मोठे फायदे

सौर वादळ पृथ्वीवर धडकणार? सूर्यावरील स्फोटानंतर 'नासा'चा इशारा, VIDEO

राज्यसभेवरून भुजबळांची उघड नाराजी; भुजबळांचा प्रस्ताव भाजपनं फेटाळला? VIDEO

मुंबईत धावतेय जीवघेणी 'बेस्ट' बस; बेस्टची काटकसर मुंबईकरांच्या जीवावर? VIDEO

SCROLL FOR NEXT