Devendra Fadnavis On Sharad Pawar Saam TV
Video

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Maharashtra Politics : २०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यामध्ये सत्तास्थापनेची चर्चा झाली होती. त्यावेळी बैठकीला शरद पवार उपस्थित होते, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केलाय.

Namdeo Kumbhar

शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर सत्तास्थापनेची रणनीती ठरल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केले. २०१९ मध्ये झालेल्या पहाटेच्या शपथविधीवर अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पुन्हा एकदा त्याची चर्चा सुरु झाली होती. आता देवेंद्र फडणवीस यांनी त्याबाबतचा गौप्यस्फोट केलाय. ११ नोव्हेंबर २०१९ मध्ये मला शरद पवारांचा फोन आला होता. अजित पवार यांना तुमच्याकडे पाठवतो, असे सांगितले होते. त्यानंतर सत्तास्थापनेची बैठक झाली, असे देवेंद्र फडणवीस यांनी टाइम्स ग्रुपला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितले की, २०१९ मधील सत्तास्थापनेच्या बैठकीला शरद पवार उपस्थित होते. त्याशिवाय अजित पवार, प्रफुल्ल पटेलही उपस्थित होते. या बैठकीला अदानी उपस्थित नसल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

२०१९ मध्ये उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत सत्तास्थापन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत एकत्र आणण्यासाठी बैठक झाली होती. ही बैठक अदानी यांच्या निवास्थानी झाली नाही. त्या बैठकीला अदानी उपस्थित नव्हते. सत्तास्थापनेच्या बैठकीला शरद पवार, अमित शाह, अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT