Raigad Fort: रायगडाचा महादरवाजा शत्रूला लांबून कधीच दिसू नये असा का बांधला होता?

Surabhi Jayashree Jagdish

रायगड किल्ला

रायगड किल्ल्याचा महादरवाजा हा केवळ एक प्रवेशद्वार नसून अत्यंत विचारपूर्वक केलेल्या लष्करी अभियांत्रिकीचा उत्कृष्ट नमुना आहे. तो अशा पद्धतीने बांधला आहे की, शत्रूला तो लांबून सहज दिसत नाही. यामागे ब्लाईंड स्पॉट इंजिनीयरींग आणि मोमेंटम कॅन्सलेशन सारखी रणनीती वापरली गेलीये.

Raigad Fort | saam tv

महादरवाजा लपवून का बांधला गेला?

महादरवाजा सरळ रेषेत दिसेल असा ठेवलेला नाही, त्यामुळे दूरून येणाऱ्या शत्रूला प्रवेशद्वार ओळखता येत नाही. दरवाज्याचा मार्ग वळणावळणाचा ठेवलेला आहे, त्यामुळे थेट आक्रमण शक्य होत नाही.

Shivaji Maharaj Forts | saam tv

Blind Spot Engineering म्हणजे काय?

ब्लाईंड स्पॉट इंजिनीयरींग म्हणजे अशी रचना जिथे महत्त्वाचे भाग दृष्टीआड ठेवलं जातात. रायगडमध्ये दरवाजे आणि प्रवेशमार्ग अशा कोनात बनवले आहेत की ते थेट दिसत नाहीत. यामागे शत्रूची दिशा आणि लक्ष्य गोंधळवणं हा मुख्य हेतू होता.

Indian Fort Architecture | saam tv

महादरवाजाची वळणदार रचना

महादरवाजापर्यंत पोहोचण्यासाठी सरळ रस्ता नाही तर वळणदार आणि अरुंद मार्ग आहे. हा मार्ग शत्रूच्या हालचाली मंद करतो आणि त्याची गती कमी करतो. वळणांमुळे अचानक हल्ला करणं किंवा वेगाने पुढे जाणं शक्य होत नाही. यामुळे संरक्षण करणाऱ्यांना पूर्ण नियंत्रण मिळते.

Blind Spot Engineering | saam tv

Momentum Cancellation Science म्हणजे काय?

मोमेंटम कॅन्सलेशन म्हणजे शत्रूच्या वेग आणि आक्रमणाच्या शक्तीला नैसर्गिक रचनेने कमी करणं. अरुंद, चढ-उतार असलेले मार्ग शत्रूचा वेग आपोआप तोडतात. अचानक थांबा आणि वळणं यामुळे त्याची आक्रमण शक्ती कमी होते. अशावेळी मोठ्या सैन्याचा वेगवान हल्ला निष्फळ ठरतो.

Momentum Cancellation | saam tv

दरवाज्याजवळील भू-रचना आणि नैसर्गिक संरक्षण

महादरवाजा डोंगराच्या कडेला आणि उंच चढावर आहे, ज्यामुळे तो नैसर्गिकरीत्या सुरक्षित होतो. खडकाळ भाग आणि अरुंद पायऱ्या यामुळे मोठ्या सैन्याला एकाच वेळी हालचाल करता येत नाही.

Maratha Empire History | saam tv

शत्रूला भ्रमित करणारी रचना

दरवाज्यापर्यंत पोहोचताना शत्रूला खरा प्रवेशमार्ग लगेच समजत नाही. अनेक वळणांमुळे तो चुकीच्या दिशेला जाऊ शकतो किंवा थांबतो. काही ठिकाणी बनावट मार्ग आणि अडथळ्यांचा आभास निर्माण केला जातो. यामुळे मानसिक गोंधळ निर्माण होतो.

Hill Fort Strategy | saam tv

Kandhar Fort: नांदेडच्या कंधार किल्ल्याभोवतीच्या १०० फूट रूंद आणि खोल खंदकातील पाणी कडक उन्हातही का आटत नाही?

Rashtrakuta dynasty | saam tv
येथे क्लिक करा