Devendra Fadnavis In Beed X
Video

Devendra Fadnavis : "सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात.." CM देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

Devendra Fadnavis In Beed : देवेंद्र फडणवीस आज बीड दौऱ्यावर आहेत. विकास कामांच्या लोकार्पणासाठी ते बीडमध्ये आहेत. या निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुरेश धस यांच्यावर भाष्य केले.

Yash Shirke

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बीड दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते बीडमधील अनेक विकास कामांचा लोकार्पण कार्यक्रम आज पार पडला. त्यांच्या बीड दौऱ्यात एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच 'या कामामुळे ज्यांचा उल्लेख या तालुक्यामध्ये आधुनिक भगीरथ म्हणून होणार आहे असे आमदार सुरेश धस' असे विधान केले.

"ज्यावेळी कृष्णा, भीमा खोऱ्याचं नियोजन सुरु होतं. तेव्हा भीमेच्या उपखोऱ्यात मराठवाड्याचा भाग येतो. त्यामुळे मराठवाड्याला खोऱ्याचं पाणी मिळालं पाहिजे. अशा प्रकारचा विचार पुढे आला. त्यातून गोपीनाथ मुंडेंसारख्या अनेक नेत्यांनी कृष्णा खोऱ्यातील २३ टीएमसी पाणी हे मराठवाड्याला मिळायला हवं असा प्रयत्न केला. त्यानंतर त्याची अंमलबजावणी झाली नाही. खोऱ्यातील पाणी धाराशिव जिल्ह्यात यायचं होतं, मग तिथून बीडला मिळणार होतं. मुख्यमंत्री म्हणून याचा आम्ही पाठपुरावा केला. या प्रकल्पाला मान्यता दिली. निधी उपलब्ध करुन दिला. ज्या वेळी पुन्हा नव्याने जलसिंचनमंत्री म्हणून माझ्याकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात यांच्या जबाबदारी आहे. सुरेश धस साहेबांनी.. शब्द जरा चुकीचा आहे की.. सुरेश धस मागे लागले की डोकं खाऊन टाकतात. त्यांनी या प्रश्नाचा पाठपुरावा केला." असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT