CM Devendra Fadnavis assures OBC community of protection amid Maratha quota GR controversy. Saam Tv
Video

Devendra Fadnavis: हे राज्य असेपर्यंत ओबीसीवर अन्याय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस|VIDEO

Devendra Fadnavis Assurance On OBC Rights: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. खऱ्या कुणबींनाच या जीआरचा लाभ मिळणार असून सरसकट आरक्षण दिलेले नाही, असे त्यांनी सांगितले.

Omkar Sonawane

मराठा आरक्षणाच्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही – फडणवीस

खऱ्या कुणबींनाच जीआरचा फायदा, सरसकट आरक्षण नाही

छगन भुजबळ नाराज नसल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान

ओबीसी संघटनांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीसांनी दिली

मराठा आरक्षणाच्या संदर्भात निघालेल्या जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होईल, असा संभ्रम पसरवला जात आहे. मात्र याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट आश्वासन दिले आहे. जीआरमुळे ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही. खऱ्या कुणबींनाच या जीआरचा फायदा होईल. कुणावरच अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीसांनी सांगितले की, काही जण जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत. सरसकट आरक्षणाचा जीआर सरकारने काढलेला नाही. निजामकाळातील हैदराबाद गॅझेटीयरमध्ये ज्या नोंदी आहेत, त्यांनाच कुणबी प्रमाणपत्र मिळणार आहे.

दरम्यान, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. भुजबळ नाराज नाहीत. त्यांच्या मनातील संभ्रम आम्ही दूर करू, असे त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणाचा जीआर काढल्यानंतर काही ओबीसी संघटनांनी सरकारच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. तसेच हे राज्य असे पर्यंत ओबीसी संघटनांवर अन्याय होणार नाही असा विश्वासही त्यांनी ओबीसी समाजाला दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Love Story: मुलगा हमाली करतो म्हणून नकार,आज आहे सुखी संसार; अशी आहे बिग बॉस फेम रोशन भजनकरची फिल्मी लव्हस्टोरी

Suryakumar Yadav: सूर्यकुमार यादववर आरोप करणं पडलं महागात; 'त्या' अभिनेत्रीवर १०० कोटींचा मानहानीचा दावा

Maharashtra Elections Result Live Update : पुण्यात भाजपचे चौथे पॅनल विजयी, सर्व महिला उमेदवार जिंकल्या

अजित पवारांना मोठा धक्का, पिंपरी चिंचवडमध्ये भाजपचे 74 उमेदवार आघाडीवर |VIDEO

Jalgaon Municipal Election Result: भाजपनंतर राष्ट्रवादीनं उघडलं विजयाचं खातं; बंडखोर उमेदवाराचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT