Devendra Fadanvis News SaamTv
Video

VIDEO : मोदींच्या प्रचाराचा नारळ धुळ्यात का फुटला? फडणवीसांनी सांगितलं कारण | Marathi News

Devendra Fadanvis News : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात खानदेशातून आणि त्यातही धुळ्यातून झाली आहे. यामागचं कारण देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

Saam Tv

ज्या धुळ्याला नंबर वन करण्याचा चंग नरेंद्र मोदी यांनी ठेवला आहे. त्याच धुळ्यातून मोदींच्या सभेची सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात मागच्या दहा वर्षात जे काम झालंय त्यावरून पुढच्या पाच वर्षात धुळे जिल्हा हा महाराष्ट्रातील नंबर एकचा जिल्हा होईल, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळ्यातील सभेत केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्ह्यात त्यांच्या प्रचारसभा होणार आहे. यावेळी फडणवीस यांनी भाषणात पहिली प्रचारसभा धुळ्यात होत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, 'धुळे जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम मोदींच्या आशीर्वादानं होत आहे. सुलवाडे जामफळ प्रकल्पातून आज जिल्ह्याच्या प्रत्येक शेतीपर्यंत पाणी जात आहे. शहराला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये म्हणून अक्कलपाडा धरणाची उंची वाढवण्याचं काम आता बघायला मिळत आहे. आज धुळ्यामध्ये मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोरसह अनेक प्रकल्प मनमाड - इंदोर रेल्वेच्या माध्यमातून जोडले गेले आहे. त्यामुळे धुळे जिल्हा राज्यातील पुढचं इंडस्ट्रीज सेंटर बनेल', असा विश्वास यावेळी बोलताना फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT