Devendra Fadanvis SaamTv
Video

VIDEO : पावसात सभा झाल्यावर निवडून येतात; भाषणावेळी पाऊस आला, फडणवीसांचा शरद पवारांना टोला

Devendra Fadanvis : शिरोळ येथे देवेंद्र फडणवीस यांची सभा सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावली. यावेळी पावसात भिजत भाषण करत फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Saam Tv

पावसात सभा झाल्यावर निवडून येतात, असं नेते म्हणतात. हा शुभ संकेत आहे. आता मी पावसात सभा घेत आहे. त्यामुळे सत्यजित देशमुख यांची सीट निवडून येणं पक्क आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना टोला लगावला आहे. आज शिरोळ येथे देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी सभा सुरू असतानाच अचानक पावसाने हजेरी लावली. त्यावरून फडणवीस यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. पाऊस पडो अथवा ना पडो पण मतांचा पाऊस पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, असंही यावेळी फडणवीस यांनी म्हंटलं आहे. पावसात भिजत केलेल्या या भाषणात शिरोळ मतदारसंघासाठी पैशांची कमतरता पडू देणार नाही, असं आश्वासनही फडणवीस यांनी दिलं आहे. तसंच शिरोळसाठी सगळ्या मागण्या पूर्ण करून दाखवू. पाच वर्षांनी पुन्हा मत मागण्यासाठी येऊ तेव्हा त्यातील एकही मागणी शिल्लक नसेल हे वचन देण्यासाठी मी आलो आहे, असं सांगत आमचं सरकार सामान्य माणसाचं सरकार आहे, असं फडणवीस म्हणालेत.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मतदानाच्या आदल्यादिवशी EVMमध्ये छेडछाड? शिंदे सेनेच्या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ

Eyebrow Shaping Tips: घरच्या घरी करा परफेक्ट आयब्रो! पार्लरशिवाय सुंदर शेप मिळवण्यासाठी 2 सोप्या ट्रिक्स

Maharashtra Politics: शिंदेसेनेला मुंबईत फक्त 56 जागा? भाजपनं केली शिंदेसेनेची कोंडी?

Maharashtra Live News Update: कणकवली घोणसरीत मादी बिबट्याला केले जेरबंद

ठाकरेचं ठरलं, जागांवर अडलं? युतीच्या घोषणेला जागावाटपाचा अडसर?

SCROLL FOR NEXT