Devendra Fadanvis News SaamTv
Video

Devendra Fadanvis : ''.. तर कॉंग्रेस विसर्जित केलं पाहिजे''; फडणवीसांच मोठं विधान

Mahatma Gandhi : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी आणि कॉंग्रेसच्या स्थापनेबद्दल मोठं विधान केलं आहे.

Saam Tv

'गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर आता कॉंग्रेसची उपयोगिता संपली आहे. कॉंग्रेस विसर्जित केलं पाहिजे अशा सूचना मांडल्या होत्या. जर हे खरच गांधीजींना मनात असतील तर त्यांनी ही सूचना मान्य करावी. असे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना उद्देशून केले आहे.

उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष या गरीब आणि गरजू रुग्णांना सेवा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पोर्टलचे उद्घाट आज करण्यात आले आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून करण्यात येत असलेल्या आंदोलनावर यावेळी त्यांनी भाष्य केलं. ''गांधी जयंती हा शांतपणे बसून त्यांच्या विचारांवर मंथन करण्याचा, आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे. हा आंदोलन करण्याचा दिवस नाही. गांधीजींनी स्वातंत्र्यानंतर म्हंटलं होतं की आता कॉंग्रेसची उपयोगिता संपली आहे. कॉंग्रेस विसर्जित केलं पाहिजे, अन्यथा कॉंग्रेस देशाच्या प्रगतीत अडथळा बनेल. अशा सूचना त्यांनी दिल्या होत्या. जर कॉंग्रेस खरच गांधीजींना मनात असेल तर त्यांनी या सुचनेचे पालन करावे. मात्र गांधीजींच्या नावाचा राजकीय उपयोग केला जात आहे.'' असा टोला त्यांनी लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आईचे दूध सर्वोत्तम! तुकाराम मुंढेंच्या नव्या ऑर्डरमुळे कंपन्यांचे धाबे दणाणले, शिशू आहाराच्या पॅकेजिंगसाठी ५ कडक नियम

Maharashtra News Live Update: पश्चिम विदर्भातील 56 तालुक्यात दुष्काळ जाहीर

आमदार-खासदारांशी उद्धटपणे वागाल तर खबरदार...; अधिकाऱ्यांसाठी सरकारकडून नवे नियम जाहीर

Om Namah Shivaya Mantra Benefits: रोज १०८ वेळा ॐ नमः शिवाय मंत्राचा जप केल्याने शरीरावर आणि मनावर काय परिणाम होतो?

Chandrashekhar Bawankule : ओबीसींना आता १ रुपयात जमीन मिळणार! चंद्रशेखर बावनकुळेंचा निर्णय, सर्व विभागांना आदेश; पाहा सविस्तर

SCROLL FOR NEXT