pune news  saam tv
Video

Rupali Chakankar: रूपाली चाकणकरांची Y+ सुरक्षा फक्त रील काढण्यासाठी; ती सुरक्षा काढून टाकावी, या नेत्यानी केली मुख्यमंत्र्यांकडे मागणी|VIDEO

Swarajya Party Leader Urges CM to Withdraw Y+ Security : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची असणारी Y+ सुरक्षा काढून टाकावी अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

Omkar Sonawane

सचिन जाधव, साम टीव्ही

पुणे: वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या अजित पवार यांच्यावर सर्व स्तरावरून टीकास्त्र सोडले जात आहे. यानंतर स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस धनंजय जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

या पत्रात ते म्हणाले, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांना सुरक्षीततेची गरज नाही त्यांची सुरक्षा काढा तसेच रुपालीताई चाकणकर यांच्या जिवीतास धोका नसताना Y+ सुरक्षा का व राज्यातील महिलांना यातुन असुरक्षिततेची भावना वाटु शकते. तसेच चाकणकर पोलिस सुरक्षा सोशल मिडीयावर रिल तयार करण्यासाठी वापरतात असा आरोप ही त्यांनी केला आहे.

राज्यात महिलांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. बलात्कार, हुंडाबळी, घरगुती हिंसाचार, छेडछाड अश्या घटना रोज कानावर येतात. यावरून राज्यातील मुली-महिला किती असुरक्षित आहेत हे स्पष्ट होते.

शासनाच्या राज्य महिला आयोगाकडे या संदर्भात तक्रार करण्याचे शासनाचे धोरण आहे. परंतु वैष्णवी हगवणे व मयुरी हगवणे या प्रकरणात महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवर व निष्काळजीपणावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

परंतु राज्य महिला आयोगाने अन्यायग्रस्त स्त्रियांना सुरक्षा व आधार देणे अपेक्षित असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षानाच शासनाची अतिरिक्त सुरक्षा घेऊन फिरावे लागते. त्यामुळे महिला आयोगाच्या अध्यक्षच स्वतःची सुरक्षितता करू शकत नसतील तर त्या राज्यातील महिलांना काय न्याय देतील ? त्यांना नेमका धोका कुणापासून वाटतो? महिला आयोगाच्या अध्यक्षाना या महाराष्ट्रात फिरताना असुरक्षित वाटते का ? असे असेल तर राज्यातील पीडित महिलांनी त्यांच्याकडून सुरक्षेची व न्यायची अपेक्षा कशी करावी? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

त्यामुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांची शासकीय सुरक्षा काढून ज्या महिला पीडित आहे व ज्यांच्या जीवाला धोका आहे अश्या तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त होतात त्यांना ती सुरक्षा देण्यात यावी व त्यांच्या जीव वाचवावा, ही विनंती. असे त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

टिप - महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर या महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा सोशल मिडीयावर रिल करुन हावा करणे , लाईक वाढवणे यासाठीच वापरतात हे त्यांच्याच सोशल मिडीया वरुन दिसते. असा टोलाही धनंजय जाधव यांनी लागावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Priya Marathe : प्रिया मराठे यांची शेवटची पोस्ट व्हायरल, नवऱ्यासाठी लिहिला होता खास मेसेज

Sambhajinagar : दोन जिवलग मित्रांचा करुण अंत; जनावरे चारताना तलावात पोहण्यासाठी उतरले असता बुडाले

Dengue symptoms neurological: डेंग्यूची लक्षणं हलक्यात घेऊ नका; मेंदूशी संबंधित गुंतागुंती वाढू शकतात, डॉक्टरांचा इशारा

'तो तरूण तुम्हाला बघून हस्तमैथुन..' लोकलमध्ये तरूणीच्या बाजूला बसून घाणेरडं कृत्य, नंतर जे घडलं ते भयंकर

Manoj Jarange Patil Protest Live Updates : शरद पवार दुपारी ३ वाजता मुंबईच्या दिशेने रवाना होणार

SCROLL FOR NEXT