Women Govindas and differently-abled participants adding vibrance to Sai Shakti Mitra Mandal’s Dahi Handi Festival in Dadar Saam Tv
Video

Idol Dahi Handi 2025 : महिला, अंध व दिव्यांग गोविंदांसाठी दादरमध्ये अनोखी दहीहंडी|VIDEO

Inclusive Dahi Handi: दादर पश्चिम येथील आयडियल बुक डेपो जवळ साई शक्ती मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात यंदाही महिला गोविंदा, अंध व दिव्यांगांसाठी खास दहीहंडी तसेच पथनाट्याच्या माध्यमातून अनोखा उत्सव साजरा होत आहे.

Omkar Sonawane

दादर पश्चिमेत साई शक्ती मित्र मंडळाचा दहीहंडी उत्सव दणक्यात.

महिला गोविंदांसह अंध व दिव्यांगांसाठी विशेष दहीहंडी.

सामाजिक संदेश देणारं पथनाट्य हा यंदाचा खास उपक्रम.

पारंपरिक उत्साहासोबत सर्वसमावेशकतेचं दर्शन घडवणारा महोत्सव.

दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई आणि ठाणे परिसरात कोट्यवधींच्या पारितोषिकासह उंचच उंच दहीहंड्या उभारण्यात आल्या आहेत. या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाले असून चुरस रंगण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये पुरुष पथकांसोबत महिलांच्या पथकांचाही तितकाच जोशपूर्ण सहभाग दिसून येत आहे.

‘गो गो गो गोविंदा… गोविंदा रे गोपाळा, यशोदेच्या तान्ह्या बाळा…’ असा घोष सध्या मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यात दुमदुमतोय. दादर पश्चिम येथील आयडियल बूक डेपो जवळ साई दत्त मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवात यंदाही महिला गोविंदांचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला आहे.

या मंडळाच्या दहीहंडी उत्सवाची खासियत म्हणजे येथे महिला दहीहंडी, अंध व्यक्तींसाठीची दहीहंडी तसेच दिव्यांगांसाठीची दहीहंडी अशा विविध उपक्रमांमधून अनोखा उत्साह प्रकट होतो. त्यामुळे यंदाही दादर पश्चिमेतल्या या दहीहंडी महोत्सवाबद्दल मोठी उत्सुकता पाहायला मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT