Sweet Moment Vira saam tv
Video

Viral Video: पहिल्यांदा Kiss, मग Ice Cream! मुलगी आणि हत्तीच्या पिल्लाच्या क्युट बॉन्डचा व्हिडीओ व्हायरल

Sweet Moment Viral: लहान मुलगी आणि हत्तीच्या पिल्लामधील गोड मैत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आईस्क्रीम देताना घडलेला हा क्षण पाहून युजर्स भारावले आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

सोशल मीडियावर आजकाल अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर सध्या एका छोट्या मुलीचा आणि हत्तीच्या एका पिल्लाचा अतिशय गोंडस व्हिडीओ व्हायरल होतोय. माणसांचीच नव्हे तर प्राण्यांचीही लहान पिल्लं निरागस आणि खेळकर असतात याचा सुंदर अनुभव या व्हिडीओमधून पाहायला मिळतो.

हत्तीच्या पिल्लाला दिलं आईस्क्रिम

एका चिमुकलीने बेबी हत्तीला प्रेमाने आईस्क्रीम खाऊ घातल्याचा हा व्हिडीओ युजर्सना खूप आवडलाय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका लहान मुलीच्या हातात दोन आईस्क्रीम आहेत. तिच्यासमोर एक हत्तीचं पिल्लू देखील उभं आहे.

लहान मुलगी आधी हत्तीला आईस्क्रीम देण्यासाठी पुढे जाते. यावेळी ती मुलगी तिच्या गालाकडे बोट दाखवत ‘पापी’ घेण्याचा इशारा करते. हे पाहताच बेबी हत्ती आपल्या सोंडेने मुलीच्या गालाला हलकाच स्पर्श करतो. हा क्षण पाहून आसपासचे लोकही आनंद व्यक्त करताना दिसतात.

हत्तीच्या पिल्लाने त्याच्या पद्धतीने Kiss केल्यानंतर मुलगी हत्तीच्या सोंडेत आईस्क्रीम देते. काही क्षणांनी मुलगी दुसरं आईस्क्रीम देण्यासाठी पुन्हा जवळ येते आणि पुन्हा एकदा किस करण्याचा इशारा करते. विशेष म्हणजे या वेळीही बेबी हत्ती तिला नाराज करत नाही. तो पुन्हा सोंडेने तिच्या चेहऱ्याला स्पर्श करून प्रेम व्यक्त करतो. त्यानंतर मुलगी दुसरं आईस्क्रीमही त्याला खायला देते.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्स मिळतायत. अनेकांनी या व्हिडीओला 'सगळ्यात क्यूट फ्रेंडशिप' असं म्हटलंय. काही युजर्सनी प्राणी आणि माणूस यांच्यातील जिव्हाळ्याच्या नात्यातील एक अनुभव असंही म्हटलंय.

या व्हिडीओवरून प्राण्यांशी प्रेमाने वागल्यास तेही तितक्याच प्रेमाने तुम्हाला प्रतिसाद देतात हे आपल्याला समजतं. या गोड व्हायरल व्हिडीओने सध्या सोशल मीडियावर सकारात्मक वातावरण निर्माण केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: लग्नाला नकार दिल्याने तरुणाची सटकली, आधी गर्लफ्रेंडला संपवलं; नंतर पेट्रोल टाकून मृतदेह जाळला

Maharashtra News Live Update: राहुल गांधींच्या अमित शहांवरील आरोपांनंतर लोकसभेत गोंधळ; कामकाज दुपारी ३ पर्यंत स्थगित

चांदीच्या अंगठ्यांच्या एकापेक्षा एक सुंदर डिझाईन्स; जी बघाल ती आवडेल

Rakhi Sawant slams Kangana Ranaut: 'आधी स्वतःचं चारित्र्य पाहा'; कंगना रणौतला चुडैल म्हणत राखी सावंत भडकली

Kalyan : कल्याण हादरलं! काळा तलावात सापडला १७ वर्षीय मुलीचा मृतदेह; पोलिसांनी ३२ कॅमेरे चेक केले अन्...

SCROLL FOR NEXT