Congress protest in pune Saam Tv
Video

Maharashtra Politics: पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड, नेमकं काय घडलं? VIDEO

Congress Protest: पुणे येथे काँग्रेस कार्यकर्त्यांची आणि पोलिसांची मोठी झटापट पाहयाला मिळाली, त्यामुळे काही काळ पुण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Omkar Sonawane

राज्यातील बेरोजगारी, जातीयवाद, राजकीय गुन्हेगारी, महिलांवरील अत्याचार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसह विविध मुद्द्यांवर सरकारला घेरण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने ‘आक्रोश पदयात्रा’ काढली होती. पुण्यातून निघालेली ही यात्रा मुंबई गाठून विधानसभेला घेराव घालणार होती. मात्र, पोलिसांनी या पदयात्रेला परवानगी नाकारली. तरीदेखील काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनावर ठाम राहिले आणि पदयात्रा सुरू करण्याचा निर्धार केला.

पुण्यातील शिवाजीनगर येथे पोलिसांनी ही यात्रा अडवली. यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. युवक काँग्रेसचे नेते कुणाल राऊत हे स्वतः हातात बेड्या घालून मंचावर दाखल झाले. यानंतर पोलिसांनी त्यांच्यासह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली.

माध्यमांशी संवाद साधताना कुणाल राऊत म्हणाले, बेरोजगारी, महिलांची सुरक्षा आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये कंत्राटी भरतीच्या मुद्द्यावर आम्ही ही आक्रोश यात्रा काढली आहे. निवडणुकीआधी भरती झाली, पण तरुणांना कायम न करता फसवले गेले. सरकार युवकांना आणि महिलांना न्याय देऊ शकत नाही. आम्ही १७० किलोमीटर पदयात्रा करून सरकारला धडा शिकवू. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री युवक काँग्रेसला घाबरले आहेत. मात्र आम्ही आंदोलनावर ठाम आहोत, असा इशारा त्यांनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Congress: भाजपच्या मांडीला मांडी लावणाऱ्यांना तिकिट नको; काँग्रेस उमेदवार मुलाखतीवेळी वाद

माणिकराव कोकाटेंना अटक करण्यासाठी नाशिक पोलिस मुंबईला रवाना|VIDEO

Skin Care : मेकअप काढल्यानंतर त्वचेची काळजी कशी घ्यावी? जाणून घ्या टिप्स

'पंचविशीत २-३ बीएचके फ्लॅट अन्... मुलीच्या कुटुंबाकडून भरमसाठ अपेक्षा चुकीचं', मराठी अभिनेत्रीचं लग्नाबाबत परखड मत

Shilpa Shetty: 420! अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत वाढ; गुन्हा दाखल, प्रॉपर्टी होणार जप्त

SCROLL FOR NEXT