Maharashtra Politics : अधिवेशन सुरू होताच ठाकरे गट-काँग्रेस आमनेसामने, विरोधी पक्षनेतेपदावरून मविआतच जुंपली

Maharashtra Politics: Opposition Leaders Clash: ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे, तर काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
mahavikas aghadi
mahavikas aghadiSaam Tv News
Published On

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षात जुंपण्याऐवजी महाविकास आघाडीमध्ये नाराजी दिसून आली. विरोधीपक्ष नेते पदावरून मविआमध्ये रस्सीखेच सुरू आहे. विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदावरून काँग्रेस आणि ठाकरे गट आमनेसामने आले आहेत. दोन्ही पक्षांनी विरोधीपक्ष नेतेपदावर दावा केला आहे. नाना पटोले यांनी काँग्रेसचाच विरोधीपक्ष नेता होईल, असे वक्तव्य केलंय. तर, दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्यांकडूनही विरोधी पक्ष नेते पदावर दावा केला आहे.

ठाकरे गटाकडून भास्कर जाधव यांचे नाव आघाडीवर आहे, तर काँग्रेसकडून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा आहे. मविआचा विरोधीपक्ष नेता कोण होणार? याची राज्यात चर्चा सुरू आहे.

राज्यात आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्यासाठी आक्रमक पवित्रा घेतलाय. विरोधकांकडून विधिमंडळात बैठक घेण्यात आली. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. त्यामध्ये सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा आणि विरोधी पक्ष नेते पद ठरवण्याबाबत चर्चा सुरू आहे.

खरंतर, या अधिवेशनामध्ये विरोधीपक्ष नेता ठरवला जाईल, अशी दाट शक्यता होती. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये विरोधीपक्ष नेते पदावरून नाराजी असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस ठाकरे गटावर नाराज का?

विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदासाठी शिवसेना ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष यांना पत्र पाठवलं आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील काही आमदार नाराज आहेत. कारण कुठलीही चर्चा न करता ठाकरे गटानं पत्र पाठवल्यामुळे काँग्रेस पक्षातील नेते नाराज असल्याचं बोललं जात आहे.

जर शिवसेना थेट चर्चा न करता विधानसभा विरोधीपक्ष नेतेपदासाठी, विधानसभा अध्यक्षांना पत्र पाठवत असेल तर, काँग्रेस पक्षही विधान परिषदेच्या विरोधीपक्ष नेतेपदासाठी नाव थेट जाहीर करेल, असा इशारा काही काँग्रेसच्या नेत्यांनी दिला असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com