Priyanka Gandhi Nagpur News SaamTv
Video

Congress Vs BJP : नागपुरात प्रियंका गांधींच्या रोड शोदरम्यान काँग्रेस-भाजप आमनेसामने, कार्यकर्त्यांत राडा

Priyanka Gandhi Road Show : काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ आज प्रियंका गांधी आज रोड शो ठेवण्यात आला होता. या दरम्यान कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने राडा झाला आहे.

Saam Tv

नागपुरात आज प्रियंका गांधी मध्य नागपुरातील महालात रोड शो ठेवण्यात आलेला होता. या रोड शो दरम्यान भाजप आणि कॉंग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने आल्याने दोन्ही गटात मोठा राडा झाला आहे.

काँग्रेसचे उमेदवार बंटी शेळके यांच्या प्रचारार्थ आज प्रियंका गांधी आज रोड शो ठेवण्यात आला होता. मध्य नागपुरातील महालात संघ मुख्यालय आहे. संघ मुख्यालय आणि बडकस चौक याचं एक वेगळ महत्त्व असल्याने काँग्रेसने कुठेतरी या भागात रॅली ठेवत भाजपला डिवचले होते. त्यामुळे भाजपचे पदाधिकारी यावरून नाराज होते. प्रियंका गांधी यांचा रोड शो सुरु झाल्यानंतर काही ठिकाणी भाजपचे उमेदवार प्रवीण दटके यांच्या बॅनर सोबत छेडछाड करण्यात आली, असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करत या ठिकाणी झेंडे घेऊन जय श्रीरामचे नारे द्यायला सुरुवात केली. यावेळी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील राहुल गांधी यांचे झेंडे घेऊन घोषणाबाजी करायला सुरुवात केली. खरं तर सकाळपासूनच भाजप आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये एक प्रकारचा तणाव या निमित्ताने पाहायला मिळत होता. त्यातच दोन्ही गट आमने सामने आल्याने याठिकाणी राडा झालेला दिसला. दरम्यान, पोलिसांनी दोन्ही बाजूच्या पदाधिकाऱ्यांना समजावून सांगत शांत केले. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कुठलाही अनुचित प्रकार झाला नसला तरी शाब्दिक वाद मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT