CM Eknath Shinde SaamTv
Video

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी'त बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेंची मविआतील वादावर टीका, पाहा काय म्हणाले?

ओंकार कदम

महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी त्यात बिघाडी होणारच आहे, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावात गेले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे. यावेळी दौऱ्याच्या धावपळीतसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाईंच्या गोठ्यात जाऊन तेथील गाईंना चारा खायला घातल्याचं बघायला मिळालं.

यावेळी बोलताना शिंदे यांनी, ''देवाला काही मागावं लागत नाही, दडवाला सगळं माहित आहे. बळिराजाला चांगले दिवस येऊ देत असं मागणं मागतो. सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळिराजाचा आहे. शेतकऱ्यांसाठी आणि महाराष्ट्रातील लोकांसाठी अनेक योजना केल्या आहेत. महाविकास अडिच वर्षांची कारकिर्द आणि महायुतीची दोन ते सव्वादोन वर्षांची कारकिर्दची तुलना तुम्हीच करा. जनतेच्या समोर जातोय दुध का दुध पाणी का पाणी जनताच करेल. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकित महाराष्ट्रातील जनता महायुतिला पोहोच पावती देईल. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. कोणाला किती जागा मिळणार हे दोन दिवसांत ठरेल. सगळ्या गोष्टी सन्मानानं होतील. विरोधकांकडे सगळे मुख्यमंत्रीपदासाठी गल्लीत आणि दिल्लीत फिरता आहेत. महाविकास आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी त्यात बिघाडी होणारच आहे. बाळसाहेबांचे विचार त्यांनी सोडले आहेत, त्यांना पराभव दिसत आहे त्यामुळे आता त्यांना सगळ्यात घोळ दिसत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री कोण हे शरद पवारांच्या पक्षान ठरवावा हा त्यांचा अधिकार आहे. महायुतीलाच जनतेचा कौल असल्याने त्यांनी आता विरोधी पक्ष नेत्याचा उमेदवार ठरवायला हवा. आमच्यात कोणताच वाद नाही आम्ही कामाला आणि विकासाला महत्व देतो. मी कॉमन मॅन मुख्यमंत्री आहे. जनता आम्हाला आमच्या कामाची पोचपावती देईल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local train : मध्य रेल्वेवर मोठा अपघात! लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल

Eknath Shinde : CM शिंदे थोडक्यात बचावले; हेलिकॉप्टरची करावी लागली इमर्जन्सी लँडिंग, नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Updates: शरद पवार गटाची सोमवारी ८० उमेदवारांची यादी जाहीर होणार

Maharashtra Politics: ठाकरे-काँग्रेसचं फाटलं? पत्रकार परिषदेत मविआतला विसंवाद चव्हाट्यावर; VIDEO

Sillod Politics : सिल्लोडमध्ये मंत्री अब्दुल सत्तार यांची एकाहाती सत्ता कोण भेदणार? महाविकास आघाडीकडून कोणाची तयारी? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT