Devendra Fadnavis PC SaamTv
Video

Devendra Fadnavis News : सत्तास्थापनेचा दाव्यानंतर फडणवीस काय म्हणाले.. | VIDEO

Mahayuti Press Conference : विधानसभा निवडणूक निकालाच्या 11 दिवसानंतर आज महायुतीने सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्यानंतर महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.

Saam Tv

शिवसेनेचे अध्यक्ष आणि नेते म्हणून एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळात राहावं अशी मी त्यांना विनंती करतो, ते आमची विनंती मान्य करतील अशी अपेक्षा आहे, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटलं आहे. महायुतीच्यावतीने आज राज्यपालाकंडे सत्तास्थापनेचा दावा सादर करण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब आता झालं आहे. सत्ता स्थापनेच्या दाव्यानंतर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी फडणवीस बोलत होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे अद्यापही शिंदेंच्या भूमिकेचा सस्पेन्स कायम असल्याचं दिसत आहे.

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, पाच तारखेला संध्याकाळी साडेपाच वाजता राज्यपाल महोदयांनी शपथविधीची वेळ दिली असल्याचं सांगत देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीमधील इतर सर्व घटक पक्ष, अपक्षांचा उल्लेख करत सर्वांचेच आभार मानले आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तसेच अजित पवार यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ देण्याची विनंती राज्यपालांकडे केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत हा सोहळा आझाद मैदानात होणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. तसेच किती मंत्र्यांना शपथ दिली जाईल, याची माहिती संध्याकाळी देणार असल्याचे सांगत आम्ही दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी महायुती म्हणून कायम एकत्र काम करणार असल्याचा विश्वास या वेळी फडणवीस यांनी व्यक्त केला.

Edited By Rakhi Rajput

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT